Osmanabad : `तेरणा` २५ वर्षासाठी सावंताच्या भैरवनाथला, अमित देशमुखांना धक्का..

Marathwada : उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघात तेरणा कारखाना राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा ठरतो.
Terna Sugar Factory News, Osmanabad
Terna Sugar Factory News, OsmanabadSarkarnama

Terna Sugar Factory News : उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा साखर कारखाना अखेर २५ वर्षासाठी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समुहाला देण्यात आला आहे. Osmanabad District अमित देशमुख यांच्या ट्वेन्टीवन शुगरने कारखान्याच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत कर्ज वसुली न्यायाधिकरणात धाव घेतली होती.

Terna Sugar Factory News, Osmanabad
Chandrakant Khaire : राहुल शेवाळेंची अनेक लफडी, तर बांगर पत्याचा क्लब चालवतो..

वर्षभराने न्यायालयाने कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया योग्य असल्याचा निर्वाळा देत तेरणा कारखाना सावंताच्या (Tanaji Sawant) भैरवनाथ शुगरला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय योग्य ठरवला. अमित देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातो. तेरणा कारखान्याला उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे महत्व आहे. (Marathwada) ज्यांच्या ताब्यात हा कारखाना असतो त्यांच्याकडे जिल्ह्याची राजकीय सुत्र असतात असे बोलले जाते.

ढोकी येथील तेरणा साखर कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ शुगर इंडस्ट्रीजला भाडेतत्वावर देण्यात आला होता. कारखाना आपल्या ताब्यात यावा यासाठी अमित देशमुख यांची ट्वेन्टीवन शुगर ही कंपनी देखील स्पर्धेत होती. उस्मानाबाद जिल्हा बँके कारखाना भाडेतत्वावर देण्याची निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली नाही, असा आरोप ट्वेटीवन शुगरने करत कोर्टात धाव घेतली होती.

वर्षभराच्या सुनावणी आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर निविदा प्रक्रिया योग्यच होती यावर शिक्कामोर्तब करत कोर्टाने तेरणा कारखाना भैरवनाथ समूहाला पुढील २५ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय योग्य ठरवला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जिल्हा बँकेने हा कारखाना भाडेतत्वावर देण्याची कारवाई केली होती. तेरणा कारखान्याची व्याप्ती मोठी असून ३२ हजारांवर सभासद असल्याचे बोलले जाते.

उस्मानाबाद आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यांचा या कारखान्यामुळे संपर्क आहे. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघात तेरणा कारखाना राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा ठरतो. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये भैरवनाथ शुगरचा सिंहाचा वाटा आहे. आता तेरणावर २५ वर्ष सावंत यांची सत्ता असणार आहे, त्यामुळे निश्चितच त्यांचे राजकीय वजन वाढणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com