Osmanabad : सावंतसाहेब सबुरीने घ्या, अन्यथा राजकीय बोट बुडेल..

गाढवाच्या गळ्यात तानाजी सावंतांचे फोटो लावून धिंड काढली जात आहे. शिवाय त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. (Health Minister Tajani Sawant)
Shivsena Mla Tanaji Sawant
Shivsena Mla Tanaji SawantSarkarnama

उस्मानाबाद : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (Tanaji Sawant) सावंत यांचा राजकीय प्रवास मोठा नाही. मात्र त्यांच्याकडे आक्रमक नेते म्हणून पाहिले जाते. त्याच वेळी वादग्रस्त वक्तव्यामुळेही ते कायम चर्चेत असतात. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करून त्यांनी नवीन वाद ओढावून घेतला असून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.

आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे मूळ गाव (Solapur) सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील वाकाव होय. त्यांनी पुण्यासह परिसरात जैवंतराव प्रतिष्ठाणच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात वेगळे साम्राज्य निर्माण केले आहे. तर (Osmanabad) उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील सोनारी येथे त्यांनी साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवली. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून सोनारी येथे साखर कारखाना सुरू करून राजकीय प्रवेशाची द्वारे तयार केली.

याच दरम्यान त्यांनी त्या परिसरात दुष्काळ निवारणाचे कामही सुरू केले. शिवजलक्रांतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आले. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सावंत यांच्या कामाची पाहणी केली. तिथून पुढे त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख म्हणून त्यांना संधी मिळाली. त्याचवेळी ते प्रथम चर्चेत आले. तानाजी सावंत भिकारी नाही, महाराष्ट्राला भिकेला लावेल, पण... असे वक्तव्य करीत त्यांनी स्वत:वर टिका ओढवून घेतली.

या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनीही त्यांच्यावर टिकेची झोड उठविली. त्यामुळे पक्षही अडचणीत आला होता. त्यातून मार्ग काढीत त्यांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळवली. शिवाय जलसंधारण मंत्रीपद पदरात पाडून घेतले. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात कोकण परिसरात अतिवृष्टी झाली. धरण फुटीचा प्रकार घडल्यानंतर खेकडेही धरण फोडू शकतात, असे म्हणत त्यांनी नवीन वाद ओढावून घेतला. सोशल मिडियामध्ये ते चांगलेच ट्रोल झाले. अशी वादग्रस्त व्यक्तव्य त्यांच्यासाठी नवीन नव्हेत.

Shivsena Mla Tanaji Sawant
आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक !

२०१९ मध्ये त्यांना परंडा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून संधी मिळाली. मात्र उ्दधव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. तेव्हापासून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. शिवसेनेतील बंडाळीमध्ये तानाजी सावंत यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण करीत नव्या सरकारमध्ये लाल दिवा पदरात पाडून घेतला. राज्याचे आरोग्य मंत्री पद त्यांच्या वाट्याला आले. त्यानंतर त्यांनी आपल्या कामाची सुरुवात धुमधडाक्यात केली.

शासकीय दवाखान्यातील औषधांच्या उपलब्धतेची माहिती घेण्यासाठी त्यांनी थेट पुणे शहरातील ससून हॉस्पिटल गाठले. उपस्थित रुग्णांची चौकशी केली. अधिकाऱ्यांशी संवाद साधला. औषधांचा वेळेवर पुरवठा होत नसल्याने संबंधित काही कंपन्यांच्या विरोधात त्यांनी संतापाची भावना व्यक्त केली. हाफकीन या व्यक्तीकडून तुम्ही खरेदी करू नका, असे म्हणत नवीन वाद निर्माण केला. या वक्तव्याने पुन्हा सोशल मिडियावर त्यांच्या वक्तव्याच्या चर्चा रंगू लागल्या.

पत्रकारांसह सोशल मिडायावर आक्रमक झालेल्या सावंतांनी स्वतःची शैक्षणिक पात्रता सर्वांसमोर मांडली. मला आडाणी समजू नका, मी पीएचडीधारक असून माझ्याकडे अनेक पीएचडी असणारे काम करीत असल्याची उद्विग्न भावना व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी बीड मधील एका नेत्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केले. नागडा करू असं व्यक्त करून नव्याने वाद निर्माण केला. मात्र त्याची फारशी चर्चा झाली नाही.

शनिवारी (ता. २४) हिंदू शिवगर्जना या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यांनी यामध्ये अधिकच आक्रमकपणे भूमिका मांडली. गेली दोन वर्षांपूर्वी आरक्षण उडविले आहे. त्यानंतर कोणीही आरक्षणावर बोलले नाही. मात्र आमची सत्ता येताच आता विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे, असं म्हणत मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.

Shivsena Mla Tanaji Sawant
पंकजा मुंडे रमल्या शाळकरी मुलांमध्ये; चिमुकल्यांसह स्कूलबसमधून प्रवास!

विरोधक ओबीसी, एससी यामधूनही आरक्षण मागत असून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचं त्यांनी पुढे म्हटले. आरक्षण तर मिळालेच पाहिजे. मात्र यातून द्या, असे म्हणण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असे म्हणत वाद आणखी चिघळविला. त्यांच्या या वक्तव्याने मराठा समाजातील संघटना त्यांच्या विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. यावरून त्यांनी माफी मागितली आहे. तरीही त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत.

गाढवाच्या गळ्यात तानाजी सावंतांचे फोटो लावून धिंड काढली जात आहे. शिवाय त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राज्याच्या राजकीय पटलावर मंत्री सावंत यांची आक्रमकता चांगलीच अडचणीत येत आहे. त्यामुळे यापुढे त्यांना सबुरीने घेऊन राजकीय प्रवास करावा लागणार आहे. अन्यथा राजकिय वावटळीत त्यांची नौका बुडायला वेळ लागणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com