Osmanabad : शिवसेनेची ताकद अफाट ; आपल्याला काॅंग्रेस-राष्ट्रवादीची गरज नाही..

एकीकडे महाविकास आघाडी म्हणून सोबत राहायचे आणि शिवसेनेला दूर लोटायचे असा प्रकार सध्या सुरू आहे. पंधरा वर्षात राष्ट्रवादी-काॅंग्रेसने काय केले? (Mla Tanaji Sawant)
Shivsena Mla Tanaji Sawant
Shivsena Mla Tanaji SawantSarkarnama

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या पण जिल्ह्यात विरोधात काम करणाऱ्या काॅंग्रेस-राष्ट्रवादीला चांगलेच सुनावले. (Osmanabad) जिल्ह्यात व राज्यात शिवसेनेची ताकद अफाट आहे. आपण एकट्याच्या ताकदीवर भगवा फडकवू शकतो. पंधरा वर्षात काॅंग्रेस-राष्ट्रवादीने काय झक मारली हे आपण पहात आहोत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी असली तरी आपल्याला त्यांची गरज नाही. काॅंग्रेस-राष्ट्रवादीलाच (Ncp) शिवसेनेची गरज असल्याचा जोरदार हल्ला सावंत (Tanaji Sawant) यांनी चढवला.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचा (Shivsena) माणूस बसू शकला असता, पण स्थानिक नेत्यामुळेच ते होऊ शकले नाही, असा घरचा आहेर देखील त्यांनी दिला. प्रा. तानाजी सावंत हे आपल्या तडकफडक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये सावंत हे कॅबिनेट मंत्री होते.

पुढे २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. पुन्हा मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असतांना सावंत यांना डावलण्यात आले. त्यामुळे ते पक्षावर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा अधूनमधून येत होत्या. एवढेच नाही तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी देखील चर्चा होती. परंतु आपण कुठेही जाणार नाही, असा खुलासा करत सावंत यांनी या चर्चांना पुर्णविराम दिला होता.

Shivsena Mla Tanaji Sawant
Shivsena : माणसं जमवण्यासाठी भाजप सारखं नऊवारी घालून इव्हेंट करायची आम्हाला गरज नाही..

जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडी असूनही राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे दोन पक्ष शिवसेनेला दूर लोटत असल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेषत: जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद शिवसेनेला न मिळाल्याबद्दल प्रचंड नाराज आहेत. काल झालेल्या एका कार्यक्रमात सांवत यांनी जाहीरपणे याबद्दल नाराजी बोलून दाखवत स्वपक्षातील नेत्यांनाही सुनावले. सावंत यांचा रोख राष्ट्रवादीकडे अधिक होता.

सावंत म्हणाले, शिवसेनेची ताकद जिल्ह्यात व राज्यात अफाट आहे, त्यामुळे आपण कुणाला घाबरण्याची गरज नाही. एकीकडे महाविकास आघाडी म्हणून सोबत राहायचे आणि शिवसेनेला दूर लोटायचे असा प्रकार सध्या सुरू आहे. पंधरा वर्षात राष्ट्रवादी-काॅंग्रेसने काय केले? हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असली तरी आपल्याला त्यांची नाही, तर त्यांना आपली गरज असल्याचे सावंत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com