Osmanabad : सावंतांनी भाजप सोडून सत्तेतील मित्रपक्षांनाच धुतले ; शिवसैनिक नाराज

येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने त्यावेळीही अशीच स्थिती राहिल्यास पक्ष मजबूत असुनही अतंर्गत गटबाजीचा मोठा फटका बसू शकतो. (Shivsena)
Osmanabad : सावंतांनी भाजप सोडून सत्तेतील मित्रपक्षांनाच धुतले ; शिवसैनिक नाराज
Shivsena Mla Tanaji SawantSarkarnama

उस्मानाबाद : शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातुन प्रमुख वक्ते म्हणुन येणाऱ्या आमदार प्रा.तानाजी सावंत (Tanaji Sawant) यानी आपल्या पक्षातील नेत्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाच फैलावर घेतल्याने जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शिवसंपर्क अभियानाचा खरा हेतु हा भाजपला जनतेसमोर उघडे पाडणे हा होता. (Osmanabad) पण हा हेतु विसरुन प्रा.सावंत मात्र अप्रत्यक्षरित्या भाजपला कशी मदत होईल असाच खेळ करताना दिसत असल्याची चर्चा कालच्या त्यांच्या भाषणानंतर महाविकास आघाडीसह घटकपक्ष व शिवसैनिकांमधून सुरू झाली आहे.

दरवेळी वाद निर्माण करुन चर्चेत येणार नाव म्हणजे प्रा.तानाजी सावंत अशी त्यांची आता ओळख बनली आहे. राज्यात तीन पक्षाचे सरकार, शिवसेनेचा (Shivsena) मुख्यमंत्री असतांना सावंत यांनी सत्तेतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व काॅंग्रेसवर तोंडसुख घेतले. यातून आता नवा वाद निर्माण होऊन विरोधी पक्ष असलेल्या भाजपला आयते कोलितच सावंत यांच्या टीकेने मिळाले आहे.

आपल्याच पक्षातील खासदार व आमदारांवर टीका करूनते कस चुकीचे काम करत आहेत हे देखील या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सांवत यांनी मोर आणले. यामुळे शिवसैनिक अस्वस्थ झाला असुन पक्षाची चांगली स्थिती असतांना फक्त नेत्यांमध्ये असलेल्या कुरघोडीचा थेट फटका येणाऱ्या काळात पक्षाला बसण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

एका बाजुला भाजप दररोज उठुन शिवसेनेला लक्ष्य करताना दिसत आहे, त्यामुळे सध्या कोणताही शिवसेनेचा नेता भाजपच्याबाबतीत नरमाईची भुमिका घेताना दिसत नाही. संधी मिळेल तिथे भाजपवर टीका करुन पक्षाचे काम लोकासमोर मांडताना नेते दिसतात. पण याला प्रा.सावंत मात्र अपवाद ठरत आहेत. ते भाजपवर एक भ्र शब्दही काढत नाहीत, मात्र स्वपक्ष व महाविकास आघाडीवरच टीकेची झोड उठवत आहेत.

Shivsena Mla Tanaji Sawant
Aimim : राज्यसभेसाठी एमआयएमचे दोन आमदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार ?

यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते खाजगीत सावंत यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करतांना दिसत आहेत. संपर्क प्रमुखाची जबाबदारी असल्याने संघटनेचे जिल्ह्याचे प्रमुख पद ज्यांच्याकडे आहे त्यांच्या विरोधात थेट कसे बोलायचे, यामुळे उघडपणे कुणी समोर येत नाहीये.

येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने त्यावेळीही अशीच स्थिती राहिल्यास पक्ष मजबूत असुनही अतंर्गत गटबाजीचा मोठा फटका बसू शकतो, अशी भिती या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. प्रा.सावंतानी याअगोदरही भाजपशी सलगी करत पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना नाराज केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in