Osmanabad:राणा पाटलांच्या वर्चस्वाला धक्का देत खासदार राजेनिंबाळकर ठरले किंगमेकर..

राणा पाटील यांच्याकडे जि.प., पं. स. तुळजापुर, नगरपालिका, दोन बाजार समित्यासह स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ता आहे. हे वर्चस्व अबाधित ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. (omprakash rajenimbalkar)
ranajagjitsinha patil-omprakash rajenimbalkar
ranajagjitsinha patil-omprakash rajenimbalkarSarkarnama

उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या अत्यंत प्रतिष्टेच्या निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील (ranajagjitsinha patil) यांचा मोठा पराभव झाला असुन या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. (omprakash rajenimbalkar) गेल्यावेळी राष्ट्रवादीत असलेले राणा पाटील यांनी आठ जागा जिंकुन एकहाती बँकेवर सत्ता स्थापन केली होती. (Osmanabad) भाजपमध्ये आल्यानंतर पुन्हा बँकेवर सत्ता आणण्यासाठी सज्ज असलेल्या राणा पाटलांना महाविकास आघाडीने रोखले.

विद्यमान उपाध्यक्ष कैलास शिंदे व आमदार पाटील यांचे विश्वासु संचालक सतिष दंडनाईक यांनाही पराभवाचे तोंड बघावे लागले. जिल्ह्याचा राजकारणाचा केंद्रबिंदु असलेल्या जिल्हा बँकेवरील आमदार राणा पाटील यांचे वर्चस्व कमी करण्यात महाविकास आघाडीला अखेर यश आले आहे.

गेल्या दहा वर्षाच्या निवडणुकीचा विचार केला तर कधी राणा पाटील तर कधी त्यांच्या विरोधकाकडे बँकेची सुत्रे जात होती. यावेळी राणा पाटील यांच्या एकाही व्यक्तीला बँकेत प्रवेश मिळणार नसल्याने ही फार मोठी नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे.त्यातुलनेत त्यांचे राजकीय विरोधक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे शिवसेनेचे पाच व त्यांच्या गटाचे तीन संचालक निवडून आल्याने राजेनिंबाळकराची शक्ती वाढली आहे.

ही निवडणुक या दोघांसाठी अत्यंत प्रतिष्टेची होती, त्यामध्ये राजेनिंबाळकरांना महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगली साथ मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला. त्याचवेळी कुरघोडी मध्ये राणा पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांची छुपी मदत मिळवित आघाडीला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना मदत करणारेच नेते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

या दोन्ही नेत्याबाबत आघाडीमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले असुन त्यांना पुढील काळात आघाडीत किती महत्व राहणार हे देखील स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीत असताना राणा पाटील यांना इतर तालुक्यातुनही मदत मिळत होती, मात्र भाजपची शक्ती मर्यादीत असल्याने त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसला.

माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्यासह तुळजापुर तालुक्यातील काही नेते यांची त्यांना साथ मिळायची. त्यांचे स्वतःचे उस्मानाबाद,कळंब तालुक्यामध्ये वर्चस्व असल्याने तिथे फार अडचण येत नव्हती. आता उस्मानाबाद व कळंब या दोन्ही ठिकाणी असलेल्या विकास सोसायटीच्या जागाही राणा पाटील यांच्या हातुन गेल्या आहेत.

ranajagjitsinha patil-omprakash rajenimbalkar
उस्मानाबाद जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय; भाजपचे खातेही उघडले नाही..

आमदार पाटील भाजपामध्ये गेल्यानंतरची ही स्थानिक पातळीवरची पहिलीच पंचवार्षिक निवडणुक होती, त्यामध्ये आलेल्या निकालाचा पुढील निवडणुकावरही परिणाम होणार हे उघड आहे. राजकीय समीकरण बदलवणारी ही निवडणुक सर्वच अंगाने जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरु शकेल का याविषयी चर्चा सूरु झाली आहे.

राणा पाटील यांच्याकडे सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती उस्मानाबाद, तुळजापुर, नगरपालिका तुळजापुरात सत्ता आहे. दोन बाजार समित्यासह स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये त्यांचे मोठे प्राबल्य आहे. हे वर्चस्व अबाधित ठेवण्याचे मोठ आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. तर दुसऱ्या बाजुला हे वर्चस्व कमी करण्यासाठी ओमराजे शर्थीचे प्रयत्न करणार हे उघड आहे. त्यामुळे भविष्यातील प्रत्येक निवडणुकीत अशीच ईर्षा पाहयला मिळणार हे उघड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com