Osmanabad : पवारसाहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता उद्घाटनासाठी येण्यास होकार दिला...

जिल्हा परिषद निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातुन पाडोळीत सक्षणा यांच्यासाठी सभा घेतली होती. पाच वर्षानी पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांना त्यांनी आमंत्रित केले. (Osmanabad)
Sharad Pawar-Sakshna Salgar,Osmanabad
Sharad Pawar-Sakshna Salgar,OsmanabadSarkarnama

उस्मानाबाद : पवारसाहेबांकडे जाऊन माझ्या मतदारसंघातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी आपण याल का? अशी विनंती केली. तेव्हा एका सेंकदाचा अवधी न घेता साहेबांनी सहा मार्चला चालेल का?असे मला विचारले. (Sharad Pawar) मला माझ्या कानावर विश्वासच बसला नव्हता. (Ncp) माझ्यासारख्या सामान्य मुलीसाठी दस्तुरखुद्द साहेबानी येणं हे खरच एका स्वप्नापेक्षा वेगळ नाही ते स्वप्न सत्यात उतरत असल्याने मी खरचं भारावून गेल्याची भावना सक्षणा सलगर यांनी `सरकारनामा`शी बोलतांना व्यक्त केली. (Osmanabad)

राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे रविवारी (ता.सहा) जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यांच्या येण्याचे कारण आहे ते फक्त युवती प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर. त्यांच्या जिल्हा परिषद पाडोळी सर्कलमधील विकासकामाचे उद्घाटन व लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सक्षणा सलगर यांच्यासाठी पवार यांनी हजेरी लावणे ही जिल्ह्यासाठी सुध्दा आश्चर्याची गोष्ट आहे.

सामान्य कार्यकर्त्यांचा आग्रह पवार किती नेटाने पाळतात हे यानिमित्ताने समोर आले आहे. शरद पवार हे कार्यक्रमाला येणे पक्षाच्या कोणत्याही स्तरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी सुवर्ण क्षण असतो. जिल्ह्यामध्ये पवार यांचे अत्यंत जिवाभावाची लोक असल्याने त्यानी कायमच जिल्ह्यामध्ये हजेरी लावली आहे. जिल्ह्यात पवार नव्यानेच आज येतायेत असेही नाही, पण या अगोदरचा व आताचा दौरा यामध्ये खुप मोठ अंतर आहे.

हे अंतर जिल्ह्यातील जनतेला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मधल्या काळात पक्षातील प्रमुख नेतेच इतर पक्षात गेल्याने पवार यांना व पक्षाला मोठा आघात बसला होता. त्यानंतर पवार जिल्ह्यात अभावाने आल्याचे दिसुन आले होते. विधानसभा निवडणुकीअगोदर त्यानी एक दौरा करुन कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करण्याचे काम केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकट आले तेव्हा त्याची पाहणी करण्यासाठी ते आले होते. तेव्हापासुन ते जिल्ह्यामध्ये आलेले नाहीत.

Sharad Pawar-Sakshna Salgar,Osmanabad
पिलावळांनी स्वतःची उंची, नेत्याचा प्रामाणिकपणा तपासावा ; जिल्हाउपाध्यक्षांनी समर्थकांना सुनावले

मातब्बर नेत्यासाठी पवार जिल्ह्यात कायमच आलेले आहेत,पण यावेळी ते अगदी सामान्य कार्यकर्त्यांसाठी येत असल्याने त्याबद्दल जनतेलाही कुतुहुल वाटणे साहजिक आहे.कार्यकर्त्यांसाठी त्यानी एवढा जिव्हाळा जपत वेळ दिल्याने सामान्य कार्यकर्त्यांसाठी यातुन अत्यंत चांगला संदेश जाणार आहे.सक्षणा सलगर युवती संघटनेच्या राज्याच्या अध्यक्ष असल्या तरी जिल्ह्याच्या राजकारणात त्याना अजुन भरपुर पल्ला गाठायचा आहे.

त्यांनी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेमध्ये दुसऱ्या सर्कलमध्ये जाऊन विजय मिळविला होता. तेव्हाच त्यांनी विकासाचा शब्द दिला होता,त्या सर्कलमधील लोकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडुन दिले होते. पाच वर्षात त्यानी केलेल्या विकासकामाचा आढावा व काही कामाचे उद्घाटन, लोकार्पण करण्यासाठी खास शरद पवार हजेरी लावणार आहेत. सक्षणा यांचे पक्षातील वजन यामुळे भविष्यात निश्चितच वाढेल.

सामान्य कार्यकर्ता म्हणुन पुढे आलेल्या सक्षणा याची जडणघडण राष्ट्रवादी युवती संघटनेत अधिक झालेली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची सक्षणा यांच्यावर विशेष मर्जी असल्याचे अनेकवेळा दिसुन आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातुन पाडोळीत सक्षणा यांच्यासाठी सभा घेतली होती. आज पाच वर्षानी त्यांनी पक्षाचे सर्वोच्च नेते यांना आमंत्रित करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in