Osmanabad : चौगुले मतदारसंघात परतताच माजी खासदार गायकवाडांना भेटले...

गायकवाड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे जाहिर केले आहे. (Osmanabad Shivsena)
Mla Dnyanraj Chougule News Osmanabad
Mla Dnyanraj Chougule News OsmanabadSarkarnama

उस्मानाबाद : उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) तब्बल पंधरा दिवसानी गुरुवारी (ता. सात) पहाटे मतदार संघात दाखल झाले. (Osmanabad) सकाळी नऊ वाजता उमरग्यातील संपर्क कार्यालयात काही कार्यकर्त्यांनी चौगुले यांचा पेढे भरवुन सत्कार केला. मात्र शिवसेनेचे मुख्य पदाधिकाऱ्यांची या वेळी उपस्थिती नव्हती.

दरम्यान आमदार चौगुले यांनी राजकिय गुरू, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांची निवासस्थानी भेट घेतली. (Marathwada) जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली. बंडखोरीनंतरची ही पहिली भेट असल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. राज्याच्या राजकिय घडामोडीत उमरग्याचे आमदार चौगुले यांचे नाव समोर आले.

ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे भोळ्या शिवसैनिकांना उशीरा कळाले. मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी आपण शिंदे गटात गेलो, असे चौगुले सांगत असले तरी संपूर्ण राजकिय घडामोडीत नेमकं काय चालु आहे, हे मतदारांना चांगलेच माहित आहे. आता मुख्यमंत्री म्हणून विकास कामासाठी किती निधी मिळतो हे पहावे लागेल.

उमरग्याच्या ग्रामदैवत महादेव पंचकमेटीच्या वतीने चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान उमरग्यात दोन कार्यकर्त्यांच्या मुलांच्या लग्नाला उपस्थिती लावुन चौगुले औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमालाही गेले. सलग तिसऱ्या टर्मला आमदारकीची संधी मिळालेले चौगुले यांच्यावर शिंदे गटाचा शिक्का पडला आहे. मात्र मतदारसंघात प्रा. गायकवाड यांच्याशिवाय राजकारण अवघड अशी स्थिती आहे.

Mla Dnyanraj Chougule News Osmanabad
रॅलीत शिरसाटांची मर्सिडीज धडकली, तर तिकडे शहाजी पाटलांच्या खोलीचे छत कोसळले..

गायकवाड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे जाहिर केले आहे. या दोन वेगवेगळ्या बाबी असल्या तरी आमदार चौगुले यांनी राजकिय गुरू म्हणुन त्यांची निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबतचा उलगडा मात्र होऊ शकला नाही. बंडखोरीमुळे राज्य सरकारने पोलिस सुरक्षा पुरवली आहे. चौगुले यांनी मात्र आपल्याला पोलिस सुरक्षा नको, मी तुम्हाला तसे लिहुन देतो असे सांगितले.

दरम्यान, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड म्हणाले, बंडखोरीनंतर आमदार चौगुले यांनी माझी भेट घेतली. मात्र या भेटीत राजकिय चर्चा झाली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी आपण एकनिष्ठ असल्याची भूमिका कायम आहे, यापुढेही रहाणार आहे. १५ जुलैनंतर एक मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पक्ष संघटन आणखीन मजबुत करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com