Osmanabad : आमदार पाटील थांबेनात, उपोषण सुटले, पण पाठपुरावा सुरूच..

महसुली वसुली कार्यवाही गतिमान करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याबाबत चर्चा केली. डॉ. राजेश देशमुख यांनी विमा कंपनीच्या संपत्तीचा शोध घेऊन तातडीने नोटिसा काढण्याच्या सूचना केल्या. (Mla Kailas Ghadge Patil)
Mla Kailas Ghadge Patil Meet Pune Collector News
Mla Kailas Ghadge Patil Meet Pune Collector NewsSarkarnama

उस्मानाबाद : खरीप हंगाम २०२० मधील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकविम्या बाबत कायदेशीर लढ्यात सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत सर्व विमाधारक शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देण्याचे आदेश दिले होते. विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सुनावणी घेण्यापूर्वी जमा करून घेतलेली २०१ कोटी रुपयांची भरपाई जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार ४८४ शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे.

Mla Kailas Ghadge Patil Meet Pune Collector News
Marathwada : शिवसेनेत चाललंय काय? खैरेंकडून `ते` विधान मागे, दिलगिरीही व्यक्त..

अजूनही उर्वरित ३७३.२५ कोटी रुपये कंपनीकडून प्राप्त होणे बाकी आहे. या रक्कमेची विमा कंपनीकडून वसुली करावी, या मागणीसाठी उस्मानाबादचे शिवसेना (Kailas Ghadge Patil) आमदार कैलास पाटील यांनी नुकतीच पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. (Osmanabad) पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पिक विम्यासाठी ऐन दिवाळीत आमरण उपोषण सुरू केले होते.

सात दिवसानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. तेव्हा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी विमा कंपनीवर महसुली वसुली कार्यवाही करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र दिले होते. यावर काय कार्यवाही सुरू आहे, याचा पाठपुरावा करण्यासाठी आज राजेश देशमुख यांची पाटील यांनी पुण्यात भेट घेतली.

त्यांना महसुली वसुली कार्यवाही गतिमान करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याबाबत चर्चा केली. डॉ. राजेश देशमुख यांनी विमा कंपनीच्या संपत्तीचा शोध घेऊन तातडीने नोटिसा काढण्याच्या सूचना केल्या असल्याचे यावेळी सांगितले.

तसेच शक्य तितक्या लवकर ही कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आश्वस्तही केल्याचे पाटील यांनी कळवले आहे. ही आपल्यासाठी समाधानाची बाब असून, पुढेही कार्यवाही पूर्ण होऊन रक्कम हाती येईपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in