Osmanabad : आमरण उपोषणाला बसलेल्या वडिलांच्या काळजीने लेकी भेटीसाठी धावल्या..

चार दिवसांपासून सुरु केलेल्या आमरण उपोषण स्थळी आज बाप लेकीच्या प्रेमाचा ओलावा सगळ्यांना अभुवायला मिळाला. (Osmanabad Shivsena)
Mla Kailas Patil News, Osmanabad
Mla Kailas Patil News, OsmanabadSarkarnama

उस्मानाबाद : शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील हे चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. पीक विमा आणि परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पाटील हे दिवाळी अभ्यंगस्नानाच्या दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या चिमुकल्या मुली आणि पुतणीने आंदोलनस्थळी येवून त्यांची भेट घेतली.

Mla Kailas Patil News, Osmanabad
Shivsena : सणासुदीला पण लोक इज्जत काढतात ; दानवेंचा शिंदे गटाला टोला

बापाच्या काळजीपोटी भेटीसाठी धावलेल्या लहानग्या लेकींची माया पाहून आमदार कैलास पाटील यांचे डोळे पाणावले होते. (Osmanabad) ऐनदिवाळीत वडील उपोषणा बसल्यामुळे या मुलींची घालमेल आणि काळजी प्रत्येकाला दिसत होती. बाबा तुम्ही काही खाल्ले का? अजून किती दिवस तुम्ही इथे बसणार? लेकींच्या या भाबड्या प्रश्नांनी कैलास पाटील (Kailas Ghadge Patil) आणि उपस्थितांची मनं देखील हेलावून गेली होती.

शेतकऱ्यांना दिवाळीला पिकविमा, अनुदानाची रक्कम मिळणार म्हणून आशेवर ठेवणाऱ्या सरकारविरोधात दिवाळीच्या पहिल्यादिवशी अभ्यंगस्नान करून सोमवारपासून (ता.२४) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास घाडगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत. जोवर शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळणार नाहीत, तोपर्यंत मी उठणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी करण्याची स्थिती नाही. त्यामुळे मी देखील दिवाळी साजरी न करता त्यांच्या न्यायहक्कासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप २०२० च्या पिक विम्याबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होऊनही विमा अजुनही मिळालेला नाही. शिवाय ५३१ कोटीपैकी फक्त २०० कोटीवर बोळवण करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.

त्यामुळे सरसकट ५३१ कोटी रुपयांची तरतुद करण्यासाठी राज्य सरकारने कंपनीला बाध्य करावे. ५३१ कोटीचे वाटप करतानाही त्यामध्ये काही छुपी कपात करु नये, खरीप २०२१ च्या पिकविम्याचा विचार केला तर अजुनही पिकविमा कंपनीकडुन जवळपास चारशे कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. या व इतर मागण्यांसाठी चार दिवसांपासून सुरु केलेल्या आमरण उपोषण स्थळी आज बाप लेकीच्या प्रेमाचा ओलावा सगळ्यांना अभुवायला मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in