Osmanabad : काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाती शिवबंधन बांधणार ; उद्या पक्षप्रवेश..

या भागात रविंद्र गायकवाड व ज्ञानराज चौगुले म्हणजे शिवसेना असे समीकरण असल्याने त्यांना धक्का देताना शिवसेना दिपक जवळगे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Osmananabad)
Osmanabad District Shivsena News
Osmanabad District Shivsena NewsSarkarnama

उस्मानाबाद : उमरगा लोहारा भागात शिवसेनेतील दिग्गज नेत्यानी शिंदे गटात प्रवेश केल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (Osmanabad) मात्र आता माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक जवळगे हे देखील उद्या (ता.२७) रोजी (Shivsena) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाने लोहारा तालुक्यातील शिवसेनेला चांगले बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

दिपक जवळगे काँग्रेसमध्ये बाजुला पडल्याने त्यांच्या समर्थकांकडुन दबाव वाढला होता. शिवसेनेला त्यांचा व त्यांना शिवसेनेचा चांगला पर्याय ठरेल असे बोलले जाते. (Marathwada) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोक जवळगे यांचा राजकीय प्रभाव परिसरात अनेक वर्षापासुन पाहायला मिळाला होता.आता त्यांचे चिरंजीव दिपक जवळगे राजकारणात सक्रीय असुन वेगवेगळ्या मतदारसंघातुन जिल्हा परिषदेवर ते दोनवेळा निवडुन गेले आहेत.

एकदा स्वतः तर दुसऱ्यावेळी पत्नीला निवडून आणत त्यांनी आपले राजकीय ताकद दाखवून दिली. उमरगा-लोहारा तालुक्यातील राजकारण जातीभोवती फिरते. लिंगायत समाजाचा प्रभाव दोन तालुक्यात अधिक असला तरी मराठा समाजाचे नेते राजकीय मतभेद बाजुला ठेवुन एकत्र येतात. माजी खासदार रविंद्र गायकवाड यांना जनाधार मिळाल्याने ते दोनवेळा आमदार झाले, त्यानंतर तिथे प्रभावशील नेता तयार होऊ शकलेला नाही.

आमदार ज्ञानराज चौगुले यांना तुल्यबळ उमेदवार मिळत नसल्याने त्यांना विजय मिळविणे सोपे गेले आहे. राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेतुन हे दोन्ही बलाढ्य नेते शिंदे गटात गेले. दोन तालुके शिवसेनेचे गड मानले जात असल्याने त्यांच्याबरोबर मतदार जाणार का? हा प्रश्न आहे. साहजिकच तिथे प्रबळ व सक्रीय नेत्याची शिवसेनेला गरज आहे, त्यादृष्टीने दिपक जवळगे सारखा तरुण चेहरा उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.

Osmanabad District Shivsena News
Chandrakant Khaire : पालकमंत्र्यांना कुत्रंही विचारणार नाही..

जवळगे यांची ग्रामीण भागात चांगला संपर्क असल्याचे बोलले जाते. तालुक्यात प्रभाव असलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील हे सक्रीय झाले असुन निश्चितपणे शिवसेनेतील पोकळी भरुन निघण्यास मदत मिळु शकणार आहे.

या भागात रविंद्र गायकवाड व ज्ञानराज चौगुले म्हणजे शिवसेना असे समीकरण असल्याने त्यांना धक्का देताना शिवसेना दिपक जवळगे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवळगे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असुन ते पक्षामध्ये अस्वस्थ असल्याने त्यांनी शिवबंधन बांधून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com