Osmanabad : अजित पवारांनी चालवायला घेतलेले दोन्ही कारखाने फायद्यात, साखर उताराही चांगला..

मराठवाड्यातील एखाद दुसराच कारखाना अकरा टक्केच्या पुढे गेल्याचे दिसुन आले आहे. जिल्ह्यात तर एकही कारखाना या उताऱ्याच्या जवळपासही दिसत नाहीत. (Osmanabad)
Ajit Pawar-Sugar Factory, Osmanabad Latest News Updates, Ajit Pawar News
Ajit Pawar-Sugar Factory, Osmanabad Latest News Updates, Ajit Pawar NewsSarkarnama

उस्मानाबाद : जिल्ह्यातील दोन साखर कारखाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संस्थानी चालविण्यासाठी घेतले आहेत. (Osmanabad) त्यांच्या दोन्ही कारखान्याचा साखर उतारा हा मराठवाड्यात सर्वाधिक असल्याचे दिसुन आले आहे. एखाद दुसरा अपवाद सोडला तर त्यांच्या कारखान्यातील साखर उताऱ्याच्या जवळपासही अन्य कुठला कारखाना जात नसल्याचे चित्र आहे. (Osmanabad Latest News Updates)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर विरोधक कायम टिका करतात, पण त्यांच्या कारखान्यातील व्यवस्थापनावर नक्कीच कोणालाही शंका घेता येणार नाही, अशा पद्धतीने तिथे काम चालते. (Marathwada) अधिक उतारा म्हणजे पुढील वर्षी याठिकाणी अधिकचा दर त्या भागातील ऊस उत्पादकांना मिळत असतो, त्यामुळे एकादृष्टीने शेतकऱ्यांचे हित या दोन्ही कारखान्यामुळे साधले जाणार आहे.

मराठवाड्यातील साखर कारखानदारीवर आता पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या भागातील अनेक अवसायनात निघालेले कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील पुढारी, नेत्यांच्या संस्था भाडेतत्वावर चालवायला घेत आहेत. यावरून त्यांच्यावर टीका होत असली तरी हे नेते अवसायानातील कारखाने देखील फायद्यात आणून ऊस उत्पादकांना जास्त भाव देण्यात यशस्वी ठरत आहेत.

आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संस्थानी उस्मानाबाद जिल्ह्यातील भाऊसाहेब बिराजदार व बाणगंगा हे दोन कारखाने चालवायला घेतले आहेत. आर्थिक दृष्ट्या अवसायनात गेलेले हे कारखाने आता नव्याने कात टाकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बिराजदार कारखान्याचे सुरेश बिराजदार व बाणगंगाचे राहुल मोटे या दोघांनीही अजित पवार यांच्याकडे कारखाने चालविण्यास घ्यावे, अशी विनंती केल्याचे सांगण्यात येते.

त्यानुसार अजित पवार यानी त्यांच्या संस्थाच्या माध्यमातुन दोन्ही कारखाने चालविण्यास घेतले आहेत. गेल्यावर्षी अत्यंत चांगल्याप्रकारे गाळप करुन त्यानी हंगाम यशस्वीरित्या पार पाडुन दाखवला होता. व्यवस्थापन कसे हातळावे याचा हातखंडा असल्यानने बंद पडलेल्या कारखान्यातुनही आर्थिक हित साधता येते हेच त्यांनी दाखवून दिले.

Ajit Pawar-Sugar Factory, Osmanabad Latest News Updates, Ajit Pawar News
सोलापूरचे खासदार संसदेत कधी भेटतच नाहीत : सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

हे फक्त त्या कारखानदाराचेच हित नसते तर यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यासाठी हक्काचा कारखाना ही मिळतो. अनेक कामगारांचे संसार या कारखान्यांचे बाॅयलर पेटल्याने सुरू होतात. त्यामुळे याकडे सामुहिक हित म्हणुनच पाहिले जाते. जिल्ह्याचा विचार केला तर तब्बल १३ कारखान्यांनी ऊसाचे गाळप केले असुन ते आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक गाळप ठरले आहे.

६२ लाख ९४ हजार मेट्रीक टन इतक्या ऊसाचे गाळप झाले असुन त्यातुन ६० लाख ५९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपाचा साखर उतारा सरासरी ९.६३ टक्के इतका निघाला आहे. जिल्ह्यातीलच नाहीतर संपुर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा विचार केला तर सर्वाधिक उतारा या दोन कारखान्यांचा आला आहे. बाणगंगा कारखान्याने पाच लाख नऊ हजार ६२० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले. त्यातुन पाच लाख ८२ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पन्न मिळाले आहे. सरासरी उतारा हा ११.४३ टक्के आहे.

तर भाऊसाहेब बिराजदार कारखान्याकडुन चार लाख ४८ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले तर त्यातुन पाच लाख २५ हजार इतके साखरेचे उत्पन्न मिळाले आहे. त्याठिकाणी सरासरी उतारा हा ११.६७ टक्के इतका आला आहे. या दोन्ही कारखान्याच्या तुलनेत मराठवाड्यातील एखाद दुसराच कारखाना अकरा टक्केच्या पुढे गेल्याचे दिसुन आले आहे. जिल्ह्यात तर एकही कारखाना या उताऱ्याच्या जवळपासही दिसत नाहीत. यावरुन या उताऱ्याच्या बाबतीत नेमका काय गोंधळ आहे का? याबाबत शंका व्यक्त होताना दिसते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com