Osmanabad : काॅंग्रेसच्या जवळगेसह भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

काॅंग्रेसचे दिपक जवळगे, भाजपचे माजी पंचायत समिती उपसभापती शाम जाधव, राष्ट्रवादीचे माजी नगरसवेक प्रदीप घोणे, गणेश कोचरे व नाना घाडगे यांच्यासह तीन पक्षाच्या पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश केला. (Osmanabad)
Congress, Bjp, Ncp Activites Join Shivsena News, Osmanabad
Congress, Bjp, Ncp Activites Join Shivsena News, OsmanabadSarkarnama

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक जवळगे यांच्यासह भाजप, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज (Shivsena) शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सगळ्यांना शिवबंधन बांधण्यात आले. (Osmanabad) खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.

राज्यातील सत्तातंरानंतर उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष पेटला आहे. दोन्ही बाजूने एकमेकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते फोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. (Marathwada) इकडे उस्मानाबादमध्ये मात्र काॅंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उद्धवसेनेच्या गळाला लागले आहेत.

शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर उमरगा- लोहारा भागात शिवसेनेला मोठा फटका बसला होता. मात्र आता माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक जवळगे व भाजप, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यास मदत होणार आहे.

काॅंग्रेसचे दिपक जवळगे, भाजपचे माजी पंचायत समिती उपसभापती शाम जाधव, राष्ट्रवादीचे माजी नगरसवेक प्रदीप घोणे, गणेश कोचरे व नाना घाडगे यांच्यासह तीन पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठरल्या प्रमाणे आज (ता.२७) मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Congress, Bjp, Ncp Activites Join Shivsena News, Osmanabad
Osmanabad : सावंतसाहेब सबुरीने घ्या, अन्यथा राजकीय बोट बुडेल..

ठाकरेंनी या सगळ्यांचे शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केले. या प्रवेशाने लोहारा तालुक्यासह जिल्ह्यात शिवसेनेला बळ मिळणार आहे. दिपक जवळगे काँग्रेसमध्ये बाजुला पडल्याने त्यांच्या समर्थकांकडुन पक्षांतरासाठी दबाव वाढला होता.

शिंदे सेनेच्या फुटीनंतर शिवसेनेला देखील नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची पक्षात गरज होती. या पक्षप्रवेशाने ती पुर्ण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचा भगवा कायम राहील यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करा, असा सूचना देत शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com