तानाजी सावंत महाविकास आघाडीसोबतच; राणा पाटलांची कोंडी

उस्मानाबाद जिल्हा बॅंकेच्या (Osmanabad District Bank Election) निवडणुकीत महाविकास आघाडीने पाच बिनविरोध जिंकून घेतली आघाडी
Rana Jagjitsinh-Tanaji Sawant
Rana Jagjitsinh-Tanaji Sawantsarkarnama

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (Osmanabad District Bank Election) बॅंकेचे कारभारी आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व ठेवून असलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjitsinh) हे एकाकी पडले असल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्षांतील नेत्यांची एकजूट कायम राहिल्याचे दिसून येत आहे. या बॅंकेच्या अर्ज माघारीच्या आज अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 15 पैकी पाच जागा बिनविरोध निवडून आज आल्या. त्यामुळे उर्वरित दहापैकी नऊ जागा मिळाल्या तरच भाजपची किंवा पाटील यांची सत्ता बॅंकेवर येणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थावर आतापर्यंत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वर्चस्व होते. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवलेले आणि पराभूत झालेले राणाजगजितसिंह पाटील विधानसभेच्या वेळी भाजपमध्ये गेले. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का बसला.

Rana Jagjitsinh-Tanaji Sawant
उस्मानाबाद जिल्हा बॅंक : आमदार, माजी मंत्र्यांचा मुलगा, भाऊ, पुतण्या हेच बिनविरोध

शिवसेना-काॅंग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बॅंक गेल्यावेळी भाजपशी आघाडी करून राष्ट्रवादीने ताब्यात घेतली होती. आता या सत्तेला हादरा बसण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येणार का, अशी चर्चा होती. पण त्यांनी एकत्र आल्याचे दाखविल्याने राणांची कोंडी झाली आहे.

प्रा. तानाजी सावंत यांनी राणा पाटलाबरोबर जुळवुन घेतल्याने त्यांचे हे सख्य जिल्हा बॅंकेत काय कमाल करते याकडे सगळ्याचे लक्ष होते. पण त्यांनीही महाविकास आघाडीची साथ न सोडण्याचे सध्या तरी दिसले आहे. सावंत यांचे पुतणेच जिल्हा बॅंकेवर आज बिनविरोध निवडून आले. त्यामुळे सावंत हे पाटील यांना मदत करण्याची शक्यता दुरावली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान आज अर्ज माघारीनंतर महाविकास आघाडीची जिल्हा बँकेवर सत्ता येईल. सर्वच्या सर्व जागा मोठ्या मताधिक्याने जिंकू, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते तथा काँग्रेसचे राज्य कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.

Rana Jagjitsinh-Tanaji Sawant
उस्मानाबाद जिल्हा बॅंक भाजपच्या ताब्यात? की महाविकास आघाडी सरस ठरणार.

राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असल्याने बँकेला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी त्याचा मोठा फायदा होणार असल्याचा दावाही श्री. पाटील यांनी केला. निवडणूक बिनविरोध व्हावी ही महाविकास आघाडीचीही इच्छा होती. पण, काही लोकामुळे ती होऊ शकली नसल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दहा जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी श्री. पाटील बोलत होते.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते.

‘‘बिनविरोधासाठी नुसत्या चर्चा करून उपयोग नसतो, भाजपला सर्व ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून बिनविरोध निवडणूक होण्यासाठी कोणतेही अडचण नव्हती’’, असे मत खासदार राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले.

Rana Jagjitsinh-Tanaji Sawant
जामीन मिळताच 24 तासांत 'आयसीयू'तील आमदार नितेश राणेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

महाविकास आघाडीचे उमेदवार
उस्मानाबाद ः अण्णासाहेब पाटील (शिवसेना)
कळंब ः बळवंत घोगरे (शिवसेना)
लोहारा ः दत्तात्रय पाटील (काँग्रेस)
पतसंस्था ः सुरेश बिराजदार (राष्ट्रवादी काँग्रेस)
इतर संस्था ः संजय देशमुख ः (शिवसेना)
महिला ः प्रणिता कोलते (राष्ट्रवादी काँग्रेस)
महिला ः अपेक्षा आष्टे (काँग्रेस)
एस. सी. ः संजय कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ओबीसी ः मेहबुब पटेल (काँग्रेस)
एन. टी. ः संजीव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com