कॉंग्रेसला विरोध ही आमची चूकचं..इंदिरा गांधींना 'त्या' चुकीची शिक्षा मिळाली होती : दक्षिणायन

Bharat Jodo Yatra : कॉंग्रेसच्या यात्रेत आता जर सहभाग घेतला नाही तर लोकशाही धोक्यात येईल.
Indira Gandhi, Rahul Gandhi, Bharat Jodo Latest News
Indira Gandhi, Rahul Gandhi, Bharat Jodo Latest News Sarkarnama

विकास देशमुख

अर्धापूर : कॉंग्रेस सत्तेत असताना आम्ही कॉंग्रेसचा विरोध केला. ते सत्ताधारी असल्याने ती त्यावेळची भूमिका होती.आमच्या विरोधाचा फायदा घेऊन मूलतत्ववादी भाजप सत्तेत आला. आता लोकशाही धोक्यात आहे. कॉंग्रेसला विरोध करणे ही आमची चूक होती, अशी खंत दक्षिणायन चळवळीचे कार्यकर्ते, लेखक, विचारवंत संदेश भंडारे यांनी व्यक्त केली‌.

६० वर्षीय भंडारे हे गांधींच्या भारत जोडो यात्रेत देगलूरपासून पायी चालत आहेत. ते आता मध्य प्रदेशातच थांबणार आहेत. शुक्रवारी (ता. ११ नोव्हेंबर) अर्धापूरच्या पुढे यात्रेत त्यांची भेट झाली. 'तुम्ही कॉंग्रेसच्या या यात्रेत म्हणजे तुम्ही राजकारणात का?' असे त्यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, "राजकारण कोण करत नाही. प्रत्येक बाबीत राजकारण आहे आणि त्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा आहे. (Indira Gandhi, Rahul Gandhi, Bharat Jodo Latest News )

Indira Gandhi, Rahul Gandhi, Bharat Jodo Latest News
अर्धापुरात फुलांची उधळण करीत राहुल गांधींचे जल्लोषात स्वागत...

कॉंग्रेसच्या यात्रेत आता जर सहभाग घेतला नाही तर लोकशाही धोक्यात येईल. भाजप लोकशाही मूल्ये पायदळी तुडवण्याचे काम करीत आहेत. ही यात्रा मूलतत्ववादाच्या विरोधात आहे. सामान्य माणसांच्या हक्कासाठी आहे.

समाजवादाची पेरणी करण्यासाठी आहे. सध्या देशात एकच संस्कृती, एकच भाषा, एकच धर्म अशा पद्धतीची सक्ती करण्याचा प्रयत्न होत आहे. एकट्या हिंदू धर्माचा विचार केला तर हिंदू धर्मातच ५० प्रकारच्या वेगवेगळ्या संस्कृती दडलेल्या आहे. हे आपल्या देशाच्या विविधतेत एकतेचे उत्तम उदाहरण आहे. पण, ही एकजूटच आज धोक्यात आणली जात आहे. हे आणीबाणीपेक्षाही भंयकर आहे. आणीबाणीत किमान अधिकार होते.आता तेही नाहीत. याचा अर्थ असा नाही की आणीबाणीचे समर्थन करतो.आणीबाणीची शिक्षा इंदिरा गांधीला देशाने पराभूत करून दिली. त्यांचा पराभव झाला होता. आताही तसेच होणार आहे", असेही ते म्हणाले.

Indira Gandhi, Rahul Gandhi, Bharat Jodo Latest News
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी केली अटक

काय आहे दक्षिणायन?

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर धर्मांध असलेल्यांच्या विरोधात दक्षिणायन चळवळ सुरू झाली. साम्यवादी, पुरोगामी विचार यासाठी ही चळवळ काम करते. गणेश देवी, संदेश भंडारे यांचा स्थापनेत मोठा वाटा आहे.

सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी विचारवंत, लेखक हे राजकारणापासून दूरच असतात. त्यांना जोडण्याचे धोरण आता कॉंग्रेसने स्वीकारले आहे. ही मंडळी समाजाची सूक्ष्म निरीक्षण आहे. तळागाळात जाऊन ती काम करते. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा पक्ष संघटनेसाठी उपयोग करून भाजपला रोखण्याचा पक्ष कामाला लागला. त्याचाच भाग म्हणून दक्षिणायन चळवळ भारत जोडो जोडली गेली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in