कंत्राटदार, हात अडकलेले अन् भाडोत्री लोकच शिरसाटांच्या रॅलीत ; अंबादास दानवेंचा आरोप

शिवसेनेचा कोणातही मोठा पदाधिकारी शिरसाटांच्या समर्थनासाठी तिथे नव्हता. म्हणून भाड्याने आणलेली ही गर्दी आणि शंभर गाड्या कधी शून्य होतील हे कळणार देखील नाही. (Mla Ambadas Danve)
Mla Ambadas Danve-Sanjay Shirsat
Mla Ambadas Danve-Sanjay ShirsatSarkarnama

औरंगाबाद : बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची काल शहरातून वाहन रॅली निघाली, ती मोठी होती हे मान्य. पण यात सहभागी झालेले लोक हे त्यांचे कंत्राटदार, हात अडकलेले किंवा भाडोत्री आणलेले होते. वाहन देखील शहरातील नव्हती तर भाड्याने बाहेरून मागवण्यात आली होती, असा आरोप शिवसेनेचे (Shivsena) आमदार जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला. शिवसेनेला कधी भाडोत्री, पैसे देऊन लोकांना बोलावयची गरज पडली नाही आणि पडणारही नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे २० दिवसानंतर काल औरंगाबादेत परतले. शिंदे यांच्या बंडात शिरसाट यांचा मोठा रोल होता असे देखील बोलले जाते. शिवाय नव्या सरकारमध्ये मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा देखील आहे. (Aurangabad) त्यामुळे शहरात दाखल होताच शिरसाट यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत विमानतळ ते संपर्क कार्यालय अशी चारचाकी वाहन रॅली काढली होती.

त्यानंतर संपर्क कार्यालयासमोरच त्यांनी जोरदार भाषण करत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर शिरसाट यांचा रोख होता. यावर आज अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देतांना शिरसाटांची वाहन रॅली आणि शक्तीप्रदर्शन म्हणजे भाडोत्री लोकांच्या जीवावर केलेला कार्यक्रम होता. ज्या चारचाकी गाड्या या रॅलीत सहभागी होत्या त्या टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सकडून पैसे देवून मागवण्यात आल्या होत्या.

Mla Ambadas Danve-Sanjay Shirsat
शिंदे सरकारचा विस्तार ठरला : मलईदार खाती भाजपला; नगरविकासवर शिंदेंची बोळवण

मी त्या गाड्यांचे क्रमांक त्यांना पैसे कोणी वाटले याची माहिती सुद्धा देऊ शकतो. त्यांच्या समर्थनासाठी जे लोक जमले होते, ते एकतर त्यांचे कंत्राटादर, भाडोत्री आणि काही ज्यांचे हात अडकलेले आहेत असे होते. कुणी स्वःताच्या मर्जीने तिथे आलेला नव्हता. शिवसेनेचा कोणातही मोठा पदाधिकारी शिरसाटांच्या समर्थनासाठी तिथे नव्हता. म्हणून भाड्याने आणलेली ही गर्दी आणि शंभर गाड्या कधी शून्य होतील हे कळणार देखील नाही. शिवसेनेला पैसे देऊन भाडोत्री लोक आणण्याची आतापर्यंत कधी गरज पडली नाही आणि यापुढे देखील पडणार नाही, असेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in