Udaysingh Rajput : शिवसेना आमदाराची `खाजा`तुला करत नवस फेडला ...

जुलेखा यांना सातत्याने नवस फेडण्याची आस लागली होती. परंतु कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे ते शक्य होत नव्हते. (Shivsena)
Shivsena Mla Udaysingh Rajput
Shivsena Mla Udaysingh RajputSarkarnama

औरंगाबाद : राजकाणात नेत्यांचे अनेक कट्टर समर्थक असतात, अगदी विरोधकांनी कितीही टीका केली, आरोप केले तरी समर्थक कायम त्यांच्या पाठीशी असतात. (Shivsena) कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) यांच्यावर सध्या विरोधकांकडून टीका होत आहे. मुंबईत आमदारांसाठी घर हवे,अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली होती. (Aurangabad) राज्य सरकारने तसा निर्णय देखील घेतला, पण चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर आता हा निर्णय रद्द करण्यात आला.

पण राजपूत यांनी मागणी केल्याचे कारण पुढे करत राष्ट्रवादी व इतर स्थानिक पक्षांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. परंतु एकीकडे विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत, तर दुसरीकडे राजपूत हे आमदार व्हावेत म्हणून त्यांच्या एका समर्थक भगीनीने खाजातुला करण्याचा नवस बोलला होता.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उदयसिंह राजपूत कन्नडमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. सलग तीन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना लोकांनी विधानसभेत पाठवले. आपला नेता आमदार झाल्याचा आनंद नवस बोललेल्या महिला समर्थकाला होता. नवस फेडायचा पण दोन वर्ष लाॅकडाऊन आणि कोरोना महामारीत गेले. परंतु आता परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर अखेर आज कन्नड येथे सुरू असलेल्या ऊरूसात उदयसिंह राजपूत यांची खाजा तुला करण्यात आली.

ही तुला झाल्यानंतर आपला नवस पुर्ण झाल्याचे समाधान जुलेखा अय्युब खा या भगिनीच्या चेहऱ्यावर दिसत होते. कन्नड तालुक्यातील गराडा येथील जुलेखा या महिला समर्थकाने उदयसिंह राजपूत हे आमदार व्हावेत यासाठी नवस बोलला होता. ते आमदार झाले तर त्यांची खाजा तुला करून नवस फेडण्याचा संकल्प त्यांनी अडीच वर्षापुर्वी केला होता.

Shivsena Mla Udaysingh Rajput
घरकुल योजनेचा डीपीआर मंजुर झाला; श्रेय एमआयएमचे की भाजपचे? रस्सीखेच सुरू

उदयसिंह राजपूत यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आणि ते आमदार झाले. वीस वर्षानंतर राजपूत यांना जनतेने आमदार केल्यामुळे सहाजिकच मतदारसंघात व त्यांच्या समर्थकांच्या आनंदाला उधाण आले होते. जुलेखा यांना सातत्याने नवस फेडण्याची आस लागली होती. परंतु कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे ते शक्य होत नव्हते.

अखेर कन्नड येथील ऊरूसचा मुहूर्त साधत आज आमदार राजपूत यांनी खाजा तुला करत हा नवस फेडण्यात आला. राजपूत यांनी देखील जुलेखा अय्युब खा यांचे आभार मानत आपण कायम जनतेच्या सेवेत राहू, असा विश्वास या निमित्ताने उपस्थितांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com