नाना पटोलेंची जीभ छाटणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस; भाजयुमो जिल्हाध्यक्षाची घोषणा

महाराष्ट्रातून कुणीही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ कापा आणि १ लाख लाख रुपये मिळवा, अशी घोषणा भाजयुमो जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली. (Jalna District)
Sujeet Jogas-Nana Patole
Sujeet Jogas-Nana PatoleSarkarnama

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारू शकतो, शिव्या देवू शकतो,असे वादग्रस्त विधान काॅंग्ेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भंडारा येथे केले आणि राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. (Congress) भाजप नेत्यांनी नाना पटोलेंवर टीकेची झोड उठवली असतांनाच राज्यभरात आता ठिकठिकाणी आंदोलन देखील सुरू झाले आहे. (Bjp) जालना येथे भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने पटोले यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्षाने नाना पटोले यांची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. सुजित जोगस यांनी ही घोषणा केली असून, कदीम जालना पोलिस ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून कुणीही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ कापा आणि १ लाख लाख रुपये मिळवा, अशी घोषणा भाजयुमो जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भाजयुमोचे कार्यकर्ते गेले होते. पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील या अर्जात करण्यात आली आहे.

Sujeet Jogas-Nana Patole
गावकऱ्यांनीच सांगितले मोदी नावाचा गावगुंड नाही, नाना आता कोणत्या बिळात लपलात

महाराष्ट्रात नारायण राणे यांच्यासाठी वेगळा कायदा आणि नाना पटोले यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. दरम्यान, पटोले यांची जीभ कापण्याचे आवाहन आणि त्यासाठी एक लाख रुपये बक्षीसाची घोषणा केल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com