पंकजा मुंडेंच्या विधानावर धनुभाऊ म्हणाले, पक्षाच्या सर्वोत्तम नेत्यांबद्दल त्या असं बोलत...

Pankaja Munde : मागील विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं, काय नाही झालं जनता काय करू शकते...
Dhananjay Munde, Pankaja Munde Latest News
Dhananjay Munde, Pankaja Munde Latest NewsSarkarnama

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काल आपल्या भाषणादरम्यान वंशवादावर व्यक्त केलेल्या मतावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) संपवू शकत नाहीत, असे पंकजा मुंडेंनी म्हणाल्या होत्या यामुळे त्यांच्या या विधानाची माध्यमांमध्ये जोरदाक चर्चा होत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर स्वतः पंकजा यांनी खुलासा केला. यावर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पक्षाच्या देशाच्या सर्वोत्तम नेत्यांबद्दल त्या असे बोलत असतील तर मी काय बोलू, असे म्हणत धनंजय मुडेंनी पंकजा यांना चिमटा काढला आहे. (Dhananjay Munde, Pankaja Munde Latest News)

Dhananjay Munde, Pankaja Munde Latest News
बच्चूभाऊंचा पारा चढला अन् 'शांत बस' म्हणत लगावली कानशिलात...

धनंजय मुंडे म्हणाले, कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या जर त्यांच्याच देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्याबाबतीत असं बोलत असतील तर काय बोलावं. मला एवढंच माहिती आहे की, मागील विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं, काय नाही झालं जनता काय करू शकते हे सगळं माहिती आहे. पंकजा या त्यांच्या पक्षात नाराज आहेत की नाहीत, हे मी कसं काय सांगू शकतो. हे आपणच त्यांना विचारलं काल मोदी साहेबांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याही वेगळ्याप्रकारावर त्यांना विचारलं तर आपल्याला कळेल. तसेच, त्या त्यांच्या पक्षात नाराज आहेत की, नाहीत मी कसे सांगू शकत नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde, Pankaja Munde Latest News
दौंड राष्ट्रवादीतील धूसफुस चव्हाट्यावर; रमेश थोरातांच्या समोरच आरोप-प्रत्यारोप...

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी मोदी यांचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला. यामध्ये त्यांच्याबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख नाही. मी भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात-पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या मनात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले. या संदर्भाने त्याचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तूळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com