MP Omraje Nimbalkar On Fund : तुटपुंज्या खासदार निधीबद्दल जनता दरबारात ओमराजेंचीच नाराजी..

Marathwada News : पिकांवर झालेल्या प्रादुर्भावाचा सर्वे करून नुकसानभरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करा.
MP Omraje Nimbalkar News
MP Omraje Nimbalkar News Sarkarnama

Dharashiv Political News : सर्वसामान्यांची कैफियत ऐकून घेण्यासाठी आयोजित जनता दरबारात खासदारच गाऱ्हाणे मांडत असलीत तर काय म्हणावे? पण असाच काहीसा प्रकार निलंगा येथे आयोजित जनता दरबारात समोर आला. (MP Omraje Nimbalkar Meeting News) सर्वसामान्यांची कामे करतांना निधीची अडचण येते. राज्यातील एका विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराला जेवढा निधी मिळतो, तेवढाच म्हणजे पाच कोटी, सहा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराला मिळतो, अशी खंत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जनता दरबारात बोलून दाखवली.

MP Omraje Nimbalkar News
Raosaheb Danve On PMAY News : घरकूल घोटाळ्याचे दानवेंनी केले असे वर्णन, की अधिकारी चक्रावलेच.. .

खासदाराला ३० कोटी निधी मिळाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जनता दरबारात धाराशिव लोकसभा व औसा विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या तालुक्यातील ६८ गावातील शेतरस्त्याच्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी तक्रारी मांडल्याने अखेर ओमराजे (Omraje Nimbalkar) यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. शेतरस्त्यासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औसा पॅटर्नवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. (Osmanabad) पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित जनता दरबारात त्यांनी जनतेच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

सध्या मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडाला असून २१ दिवस किंवा ३० दिवस पावसाचा खंड असेल तर विमा कंपनीने २५ टक्के रक्कम देण्याचा नियम आहे. (Shivsena) मदनसुरी, भुतमुगळी या महसूल मंडाळात पिकांवर झालेल्या प्रादुर्भावाचा सर्वे करून नुकसानभरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करा, अशा सूचना ओमराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ६८ गावातील बहूतांश गावच्या सरपंचांनी निधी देण्याची ओमराजेकडे मागणी करत यासाठी घेतलेल्या ठरावांचा ढीगच समोर ठेवला.

शेतरस्ते, गाव अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी विकास निधीची मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय गावात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक येत नाहीत अधिकाऱ्यांनी याबाबत उपस्थितीचे फोटो काढून टाकण्यासाठी लेखी आदेश काढावेत अशा सूचनाही ओमराजे यांनी दिल्या.

ग्रामपंचायतीला पाण्यासाठी मंजूर झालेल्या विहिरीसाठी गायरान जमीनी देत येत असेल तर तशी मागणी शासन स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी करावी, असे आदेश दिले. केंद्र शासनाच्या निधी वाटपावर ओमराजे निंबाळकर यांनी टीका केली. आमदार व खासदार यांचा विकास निधी तेवढाच असल्याने पाच कोटी ऐवजी तीस कोटी निधी दिला जावा, अशी अपेक्षा या निमित्ताने त्यांनी व्यक्त केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in