Omraje Nimblkar : मरेपर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही..

जे आज पक्षाला सोडून गेले आहेत, त्यांना भविष्यात शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. शिवसेनेला जेव्हा असे धक्के देण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा शिवसैनिक पेटून उठला आहे. (Mp Omrjae Nimbalkar)
Mp Omraje Nimbalkar-Uddhav Thackeray News
Mp Omraje Nimbalkar-Uddhav Thackeray NewsSarkarnama

उस्मानाबाद : शिवसेनेचा आजपर्यंतचा इतिहास पहा, जेव्हा जेव्हा पक्ष संपवण्याची भाषा, फुट आणि गद्दारी झाली, तेव्हा जेव्हा शिवसैनिक पेटून उठला आहे. ज्या घरात राजकारणाच गंध नव्हता, कुणी साधी ग्रामपंचायत लढवली नव्हती, अशा लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार, खासदार, मत्री केले. याची जाणीव माझ्या सारख्या शिवसैनिकाला आहे. त्यामुळे मरेपर्यंत मी कधीही शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडणार नाही, अशी ग्वाही पक्षाशी एकनिष्ठ असलेले उस्मानाबादचे (Osmanabad) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी निष्ठावंत विरुद्ध बंडखोर असा सामना देखील पहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते बंडखोर आमदारांपर्यंत सर्वानी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र त्या देतांना पक्षप्रमुख असा उल्लेख न करण्याचा खोडसाळपणाही केला. या पार्श्वभूमीवर खासदार (Omraje Nimbalkar) ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरांना खडेबोल सुनावतांनाच आपल्या निष्ठा कायम शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्याशीच राहतील याचा पुनरुच्चार देखील केला.

ओमराजे म्हणाले, शिवसेना सध्या ज्या संकटातून जात आहे, अशावेळी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आल्याने त्यांना मनापासून शुभेच्छा तर देतोच, पण त्यांना आई तुळजाभवानी नरोगी दिर्घायुष्य देवो ही सदिच्छा देतो. शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटासोबत गेले असले तरी मी उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबतच कायम राहणार आहे. मरेपर्यंत मी या पक्षाची आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही.

शिवसेना हे एक कुटुंब आहे, ज्याला राजकारणातलं काहीचं कळत नव्हतं, त्यांच्या घरात कुणी कधी राजकारणात नव्हतं अशा लोकांना बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या, केंद्राच्या उच्चपदावर नेऊन बसवले. माझ्या सारखा सामान्य कार्यकर्ता आमदार, खासदार होऊ शकला हे विसरता येणार नाही.

Mp Omraje Nimbalkar-Uddhav Thackeray News
शिंदे सरकारला धक्का ; न्यायालय ठरविणार औरंगाबाद की छत्रपती संभाजीनगर?

जे आज पक्षाला सोडून गेले आहेत, त्यांना भविष्यात शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. शिवसेनेला जेव्हा असे धक्के देण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा शिवसैनिक पेटून उठला आहे, हा इतिहास पहाता, गद्दारांना निवडणुकीत निश्चित धडा शिकवला जाईल, असा इशारा देखील ओमराजे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in