Omraje Nimbalkar News : कोणी खांद्यावर हात टाकला म्हणून निष्ठा बदलत नाही..

Marathwada : आमच्या खांद्यावर हात टाकून त्यांना कोणाला इशारा द्यायचा आहे, हे मी सांगण्याची गरज नाही.
Tanaji Sawant-Omraje- Kailas Patil News, Osmanabad
Tanaji Sawant-Omraje- Kailas Patil News, OsmanabadSarkarnama

Osmanabad : एखाद्या विरोधी गटाच्या व्यक्तीने खांद्यावर हात टाकला म्हणून राजकीय दिशा, निष्ठा बदलत नसते. एवढे शहाणपण सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना असल्याने प्रा.तानाजी सावंत यांच्या भेटीला राजकीय अर्थाने पाहण्याची आवश्यकता नसल्याचे मत खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केले.

Tanaji Sawant-Omraje- Kailas Patil News, Osmanabad
Harshvardhan Jadhav News : शिंदे-ठाकरेंशी काही देणेघेणे नाही, माझा आत्मा बाळासाहेबांसाठी तुटतोय..

सार्वजनिक शिवजयंतीच्या कार्यक्रमात सगळ्याच पक्षाचे नेते तिथे असताना त्यांना आमच्याबद्दलच एवढे प्रेम का आले? याचा शोध घेतल्यावर त्याचे कारण जिल्ह्यातील जनतेला विशेषतः भाजपच्या लोकांना समजून येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवजंयती निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांच्या खांद्यावर हात टाकत फोटो काढले.

हे फोटो माध्यमांवर व्हायरल होताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. काल निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. त्यानंतर लगेच जिल्ह्यातील हे तीन नेते एकत्र दिसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले. ओमराजे म्हणाले, सर्वांचे राजकीय मार्ग ठरलेले आहेत, त्यामुळे आता त्यामध्ये तसुभरही बदल होणार नाही.

ठाकरे परिवाराशी एकनिष्ट राहून विरोधकांशी लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सार्वजनिक शिवजयंतीच्या कार्यक्रमात कोणीही राजकीय नेता तिथ आपला पक्षाच्या पायघड्या ठेवत नाही. तेथे शिवभक्त म्हणून सहभागी होत असतो. पालकमंत्री तानाजी सावंत आणि आम्ही कोणत्या राजकीय व्यासपीठावर असतो तर त्याला राजकीय अर्थ प्राप्त झाला असता. पण अशा ठिकाणी महाराजांच्या जन्मसोहळ्याच्या निमित्ताने राजकारण करण्याएवढ्या संकुचित वृत्तीची भुमिका आमची अजिबात नाही.

शिंदे गटाचे पालकमंत्री असून त्यांच्याविरोधात भाजपच्या आमदारानी तक्रार केली होती, त्यांच्यासमोर आमच्या खांद्यावर हात टाकून त्यांना कोणाला इशारा द्यायचा आहे, हे मी सांगण्याची गरज नाही. पण आम्हाला त्यांच्यामध्ये पडायचे नाही, तो त्यांच्या पातळीवरचा विषय असून आम्ही दोघांकडेही विरोधक म्हणूनच पाहतो. त्यातही जर कोण उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्याबरोबर येणार असेल तर आमचा त्याला अजिबात विरोध नसेल असेही ओमराजे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com