Omraje Nimbalkar : विरोधकांच्या अमिषाला बळी पडू नका, भाजपने ग्रामपंचायतींची चुकीची आकडेवारी दिली..

Osmanabad : विकास निधी व कामाबाबत माहिती व मार्गदर्शन घ्यावे. महिलांना ग्रामपंचायत कारभारात सहभागी करून घ्यावे
Mp Omraje Nimbalkar News,Osmanabad
Mp Omraje Nimbalkar News,OsmanabadSarkarnama

Osmanabad News : विरोधक लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांना अमिष दाखवतात, पदावर काम करू देत नाहीत. (Bjp) भाजपने ग्रामपंचायतींचा चुकीची आकडेवारी पत्रकारांना दिली, असा आरोप शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. तुळजापूर येथे आयोजित नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

Mp Omraje Nimbalkar News,Osmanabad
Aimim : इम्तियाज जलील यांनी यासाठी मानले न्यायालयाचे आभार..

यावेळी त्यांनी उपस्थितांना ग्रामंपचांयतींचा कारभार कसा करावा? यासाठी महत्वाचा कानमंत्रही दिला. (Osmanabad) नुकत्याच झालेल्या ग्रामंपचायत निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांनी आम्हीच नंबर एक असल्याचा दावा केला होता. (Omraje Nimbalkar) भाजपने तर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांपेक्षा आमचे सरपंच आणि सदस्य अधिक निवडून आल्याचा दावा केला होता.

ओमराजे यांनी भाजपचा हा दावा खोटा ठरवत त्यांनी पत्रकारांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. ओमराजे म्हणाले, सरपंचाने विकासाभिमुख राजकारण करावे, सर्व योजनांचा अभ्यास करावा आपले स्वतःचे अधिकार व कर्तव्य समजुन घ्यावीत. विकास निधी व कामाबाबत माहिती व मार्गदर्शन घ्यावे. महिलांना ग्रामपंचायतचा कारभारात सहभागी करून घ्यावे, जेणेकरून त्यांना देखील या सगळ्या गोष्टींची माहिती होईल.

सध्या देशात, राज्यात आणि तालुका, गावात देखील विरोधक लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांना आमिष दाखवतात व पदावर काम करु देत नाहीत. अशा अमिषापासून आणि लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. भाजपाने ग्रामपंचायतींची चुकीची आकडेवारी पत्रकारांना दिली आणि दिशाभूल केली.

आमचेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याचा त्यांनी केलेला दावा खोटा होता हे आता सिद्ध व्हायला लागले आहे, असेही ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. या सत्कार कार्यक्रमाला माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिवनराव गोरे आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com