Omraje Nimbalkar : आतापर्यंत भाषणात ऐकलेले ७ टीएमसी पाणी २०२३ मध्ये प्रत्यक्षात आणणार..

उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची `सरकारनामा`ला खास मुलाखत
Omraje Nimbalkar  : आतापर्यंत भाषणात ऐकलेले ७ टीएमसी पाणी २०२३ मध्ये प्रत्यक्षात आणणार..
Mp Omprakashraje NimbalkarSarkarnama

उस्मानाबाद : मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून मिळणार, पैकी ७ टीएमसी उस्मानाबादला (Osmanabad) दिले जाणार हे मी आतापर्यंत अनेक नेत्यांच्या भाषणातून ऐकले होते. पण प्रत्यक्षात पाणी काही आले नाही. परंतु गेल्या दोन-अडीच वर्षात या कामाचा सातत्याने पाठपुरावा आणि त्यातील अडचणी लक्षात घेऊन या कामाला आम्ही जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीनी वेग देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा उस्मानाबादचे खासदार ओमराजेन निंबाळकर यांनी केला. खासदारकीला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल `सरकारनामा`ने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी देखील विषयात लक्ष घातले आहे. या प्रक्रियेतील टप्पा वाढवण्याचे महत्वाचे काम झाले आहे. (Shivsena) त्यामुळे येत्या सहा महिन्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाचे टेंडर निघेल आणि २०२३ मध्ये जिल्ह्याला हक्काचे ७ टीएमसी पाणी मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी व्यक्त केला.

खासदार होऊन तीन वर्ष पुर्ण झाल्या निमित्ताने `सरकारनामा`ने घेतलेल्या मुलाखतीत ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या खासकर पदाच्या तीनवर्षातील कारकीर्दीचा लेखाजोखा मांडला. (Marathwada) जिल्ह्यातील राजकारण, विकासकामे, शेती, शैक्षणिक आणि रोगगार या सर्वच विषयांवर त्यांनी आपली सडेतोड मते मांडली. मुलाखतीच्या सुरुवातीलाच तीन वर्षात काय साध्य केले ? याबद्दल ते भरभरून बोलले.

ओमराजे म्हणाले, आमचा जिल्हा शेती व्यवसायावर अवंबलून असलेल्या जिल्हा आहे. आमच्याकडची जमीन ही राज्यातील कुठल्याही भागापेक्षा अधिक सुपीक आहे. फक्त शाश्वत पाण्याची व्यवस्था नसल्याने आम्हाला सातत्याने कधी दुष्काळ तर कधी भरपूर पाहून अशा विरोधी परिस्थितीला तोंड द्यावे लागते. पाऊस झाल तर इतका प्रचंड ऊस होतो की तो गाळप करणे शक्य होत नाही, आणि कधी पाऊस न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण होतो.

पाणी, वैद्यकीय, आरोग्य सेवा, स्वतंत्र विद्यापीठ आणि रोगजार या विषयावर मी व माझ्या पक्षाने गेल्या तीन वर्षात खूप चांगले काम केले आणि त्यांचे परिमाण देखील दिसू लागले आहे. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागले, प्रचंड खर्च करावा लागला. हे पाहता उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, ही मागणी आम्ही लावून धरली होती. ज्याला यश मिळाले आणि जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले.

माझ्या दृष्टीने हे जिल्ह्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. यामुळे आता गोरगरिबांना माफक दरात चांगले उपचार जिल्ह्यातच मिळू शकतील. त्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन महागडे उपचार घ्यावे लागणार नाहीत. मेडिकल काॅलेजचे काम अंतिम टप्यात असून यंदाच प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होतील. दुसरा महत्वाचा प्रश्न होता तो पाण्याचा, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळणार हे मी अनेकदा नेत्यांच्या भाषणातून ऐकले. पण प्रत्याक्षात काही अजून हे पाणी मिळालेले नाही.

Mp Omprakashraje Nimbalkar
Chikhlikar : खासदार असूनही मला कार्यक्रमाला बोलावले जात नाही, पत्रिकेत नाव नसते..

परंतु मध्यंतरीच्या काळात आम्ही जिल्ह्याला ७ टीएमसी पाणी मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अगदी आठवड्याला पाठपुरावा केला, जलसंपदा मंत्र्यांना भेटून या प्रकल्पातील व्याप्ती वाढवण्याची मागणी केली. ती मान्य करून आता सहा महिन्यात या प्रकल्पाच्या कामासाठीचे टेंडर निघणार आहे. त्यामुळे येत्या २०२३ मध्ये ७ टीएमसी पाणी मिळणार आहे, जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी गोष्ट असणार आहे.

स्वतंत्र विद्यापीठ हवे..

उस्मानाबाद जिल्ह्यात ८८ महाविद्यालये आहेत, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र देखील इथे आहे. परंतु आम्हाला स्वतंत्र विद्यापीठ मिळावी ही आमची मागणी आहे. यासाठी नुकतीच एक समिती देखील येऊन गेली आहे, त्यांनी आपला सकारात्मक अहवाल दिलेला आहे. त्यामुळे उस्मानाबादला लवकरच स्वतंत्र विद्यापीठ आणि या भागातील एमपीएससी, युपीएससीचे उपकेंद्र देखील मिळणार आहे. याचा जिल्ह्यातील विद्यार्थांना मोठा लाभ होणार आहे.

जिल्ह्यात उद्योग नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर करत आहेत. त्यामुळे आमच्या जिल्ह्यातील एक मतदारसंघ कमी झाला आहे. साधारणतः सात ते आठ लाख लोकांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या शहरांची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसुधार, मुख्यमंत्री ग्राम सुधार योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणवर रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शेती हा जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे यंदा सर्वाधिक पीक कर्ज हे उस्मानाबाद जिल्ह्यात वाटप झाले आहे, अशी माहिती देखील ओमराजे यांनी यावेळी दिली. चाळीस वर्षात जिल्ह्यातील राजकारण्यांचे मागसलेपण दूर झाले, पण जिल्हा मागासच राहिला होता. आम्ही मात्र जेव्हा २०२४ मध्ये निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा जिल्ह्याला मागास ठेवले असा शिक्का आमच्यावर बसणार नाही, असे काम केले आहे. त्यामुळे जनता पुन्हा आम्हाला आशिर्वाद देऊन लोकसभेत पाठवेल, असा विश्वास देखील ओमराजे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in