चाळीस वर्षे शरद पवारांनी सांभाळलं, पण सत्तेसाठी त्यांचीच साथ सोडली..

खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची `सरकारनामा`ला खास मुलाखत
Rana Patil, Padmsinh Patil, Omraje Nimabalkar
Rana Patil, Padmsinh Patil, Omraje NimabalkarSarkarnama

उस्मानाबाद : चाळीस वर्ष जिल्ह्यात एकाच घराण्याची सत्ता होती, पण आता भविष्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही ही भूमिका घेऊन केवळ सत्तेसाठी त्यांनी पक्ष बदलला. ज्या शरद पवारांनी (Sharad Pawar) यांना चाळीस वर्ष सांभाळलं, ग्रामपंचायत सदस्य नसतांना विधान परिषदेत पाठवून आमदार केलं, राज्यमंत्री केलं, त्याच पवारांची साथ त्यांनी सोडली, असा घणाघात शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimabalkar) यांनी पद्मसिंह पाटील, राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता केला. खासदारकीला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल `सरकारनामा`घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

चाळीस वर्षे सत्ता उपभोगलला खासदार श्रीमंत खासदारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकवर येतो आणि त्याच खासदाराचा जिल्हा मागसलेल्या जिल्ह्यांच्या यादीत योगायोगाने तिसऱ्याच क्रमांकावर येतो, यातून यांनी चाळीस वर्षात काय दिवे लावले हे दिसते, असा टोला देखील ओमराजे यांनी लगावला. `सरकारनामा` ला दिलेल्या मुलाखतील ओमराजे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी विरोधकांबद्दलची भूमिका सडेतोडपणे मांडली. (Osmanabad) केवळ आपली आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी यांनी राजकारण केले, अशी टीका देखील त्यांनी पद्मसिंह पाटील कुटुंबावर नाव न घेता केली.

ओमराजे म्हणाले, जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे, त्यांना सगळं कळतं. यांनी चाळीस वर्षात काय दिवे लावले हे पाहिल्यानंतर लोकांनी मी आमदार असतांना केलेल्या कामावर विश्वास दाखवून मला लोकसभेत पाठवले. २००९ ते २०१४ या आमदार असतांनाच्या काळात मी लोकांना जी वचन दिली होती ती पुर्ण केली. २४ तास उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून ते माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने येतात.

माझ्या मतदारसंघात १२ तालुके आहेत, यात तुम्हाला एकही व्यक्ती असा सापडणार नाही जो म्हणेल की मी ओमराजेंना फोन केला आणि त्यांनी तो घेतला नाही. लोक निवडून देतांना तुमची क्षमता, तुम्ही काय करु शकता ? काय केले आणि तु्म्ही किती सहजरित्या उपलब्ध होता हे पाहत असतात. त्यामुळेच लोकांनी माझ्या कामावर विश्वास दाखवून मला लोकसभेत पाठवले. पण चाळीस वर्ष या जिल्ह्याला अर्थकारणासाठी राजकारण पाहण्याची सवय लागली होती.

Rana Patil, Padmsinh Patil, Omraje Nimabalkar
Omraje Nimbalkar : आतापर्यंत भाषणात ऐकलेले ७ टीएमसी पाणी २०२३ मध्ये प्रत्यक्षात आणणार..

एकाच घराण्याकडे जिल्ह्याची सत्ता होती. वडील, मुलगा, सून, नातू, भाचा हेच सत्तेत होते. पण जिल्ह्याचा विकास झाला का ? तर नाही. विकास, आर्थिक सुबत्ता फक्त यांचीच झाली. साधा ग्रामपचंयात सदस्य नसतांना शरद पवार साहेबांनी त्यांना विधान परिषदेत आमदार म्हणून पाठवले. राज्यमंत्री केले. पण पुन्हा राज्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही ही भूमिका घेऊन त्यांनी चाळीस वर्ष सांभाळ केलेल्या शरद पवारांची साथ सोडली.

पण यांचा पायगुणच इतका खतरनाक होता की हे भाजपमध्ये गेले आणि त्यांचीही सत्ता गेली. पक्ष बदलला तरी वृत्ती बदलत नाही, शिवाय चाळीस वर्षाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे तिकडे जाऊनही ते हेच करत आहेत. पण नियती कुणाला माफ करत नसते, नियतीने हे दाखवून दिले आहे, असा टोला देखील ओमराजे यांनी पद्मसिंह पाटील, राणापाटील यांना लगावला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत केलेल्या विकासकामाच्या जोरावर पुन्हा एकदा आपल्याला विजयी करतील, असा विश्वास देखील ओमराजे यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com