'शिंंदे गटात सामील होण्यासाठी ५० कोटींची ऑफर'; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics latest news | Shivsena| शिंदेंची सेना आणि उद्धव ठाकरेंची सेना आज सर्वोच्च न्यायालयात एकमेकांसमोर उभी ठाकणार आहे.
Maharashtra Politics latest news, Eknath Shinde News, Political Crisis News Updates
Maharashtra Politics latest news, Eknath Shinde News, Political Crisis News Updates

औरंगाबाद : राज्यतील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. शिंदे गटात सामील होण्यासाठी आपल्याला ५० कोटींची ऑफर दिल्याचा दावा शिवसेनेचे (Shivsena) आमदार उदयसिंग राजपूत (Udaysingh Rajput) यांनी केला आहे. एवढचं नव्हे तर दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा गौप्यस्फोट आमदार राजपूत यांनी केला आहे. पण आपल्याला १०० कोटी दिले तरी आपण शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, अशा शब्दांत आमदार राजपूत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics latest news)

उदयसिंग राजपूत औरंगाबादचे कन्नडचे आमदार आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला नवे वळण मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावेळी बोलताना उदयसिंग राजपूत म्हणाले आहे की, 'शिवसेनेशी बंडखोरी करण्यासाठी मला ५० कोटीहून अधिकची ऑफर होती. बंडखोरी करण्यासाठी माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आले होते, पण मी गद्दारी केली आहे. १०० कोटी दिले असते तरी मी गद्दारी केली नसती असंही ते म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेसोबत कोणतीही गद्दारी करणार नाही. मला ऑफर होती मात्र मी गद्दारी केली नाही. (Eknath Shinde News)

Maharashtra Politics latest news, Eknath Shinde News, Political Crisis News Updates
आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर! एकनाथ शिंदेंची डरकाळी

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड आज निर्णायक वळणार आल्याचे दिसत आहे. शिंदेंची सेना आणि उद्धव ठाकरेंची सेना आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एकमेकांसमोर उभी ठाकणार आहे. सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरू होणार असून यानंतर धक्का कुणाला बसणार, याची उत्कंठा महाराष्ट्रातच (Maharashtra) नव्हे तर देशभरात शिगेला पोहोचली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोघांसाठीही आजचा दिवस महत्वाचा आहे. पक्षाच्या बैठकीला न येणे, ही पक्षविरोधी कारवाई नाही. अल्पसंख्येत आलेल्या सरकारने प्रतोद नेमणे चुकीचे आहे, अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवडही चुकीची आहे आणि १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून होणार आहे. १०.३० वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर तासाभरात निकाल येणे अपेक्षित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com