धनुष्यबाणाची शपथ, एकही गद्दार पुन्हा निवडून येणार नाही ; शिंदेना शेती करावी लागेल..

औरंगाबादेतच नाही तर मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही रक्ताचे पाणी केले, पोलिसांचा मार खाला, जेलमध्ये गेलो. पण सत्ता, पद मिळावे म्हणून कधी गद्दारी केली नाही. (Chandrakant Khaire)
Chandrakant Khaire-Cm Eknath Shinde News
Chandrakant Khaire-Cm Eknath Shinde NewsSarkarnama

औरंगाबाद : धनुष्यबाण हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचाच आहे. ज्याने ज्याने शिवसेनेशी गद्दारी केली त्याचे पुढे काय झाले हा इतिहास एकदा उघडून पाहा. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कितीही दावा करत असले तरी ते वगळता एकही गद्दार पुन्हा निवडून येणार नाही, हे मी धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी बंडखोरांना इशारा दिला.

महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद व नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव मंजुर केला होता. (Shivsena) तो आता शिंदे-फडणवीस सरकारने स्थगित करून नव्याने मंजुर करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली या सरकारच्या विरोधात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करण्यात आली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना खैरे यांनी बंडखोरांना गद्दार असे म्हणत इशारा दिला. महाविकास आघाडी सरकारचा नामांतराचा निर्णय रद्द करून तो नव्याने घेण्याचा प्रकार म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान असून केवळ श्रेय लाटण्यासाठीच हे केले जात असल्याचा आरोप खैरे यांनी केला.

खैरे म्हणाले, केवळ औरंगाबादेतच नाही तर मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही रक्ताचे पाणी केले, पोलिसांचा मार खाला, जेलमध्ये गेलो. पण सत्ता, पद मिळावे म्हणून कधी गद्दारी केली नाही. शिवसेनेशी गद्दारी करणारे कधीच यशस्वी झाले नाही हा इतिहास आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कितीही सांगत असले की ५० आमदारांपैकी एकही पडणार नाही, मी त्यांना निवडून आणणार, पण स्वतः एकनाथ शिंदे हे पैशाचा जोरावर निवडून येतील, पण इतरांपैकी एकही गद्दार पुन्हा निवडून येणार नाही हे मी धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो.

Chandrakant Khaire-Cm Eknath Shinde News
Abdul Sattar : जिकडे जातो तिकडे.. माझ्या नावातच सत्ता..

त्यामुळे ५० पैकी एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही तर राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना गावाकडे जाऊन पुन्हा शेती करावी लागेल, असा टोला देखील खैरे यांनी लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले नाव बदलण्याचे काम मुख्ममंत्र्यांनी करू नये, त्यांच्या वडिलांचे नाव देखील संभाजी आहे, याचे भान त्यांनी ठेवावे, असेही खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in