प्रलंबित खटल्यांची संख्या पाच कोटींवर, गुणवत्तेवरही परिणाम : किरेन रिजिजू

महाराष्ट्र सरकारने शहराचे नाव नुकतेच बदलले आहे मात्र अधिसूचना नसल्याने औरंगाबादच म्हणेन. (Aurangabad)
Central Minister Kiran Rijiju
Central Minister Kiran RijijuSarkarnama

औरंगाबाद : देशाचे विधी व न्यायमंत्री म्हणून मी शपथ घेतली त्यावेळी चार कोटी खटले प्रलंबित होते, आता तो आकडा पाच कोटींपर्यंत गेला आहे. (Aurangabad) युके, युएस मध्ये दिवसाला साधारणत: तीन ते चार खटले सुनावणीस घेतले जातात मात्र, देशात हीच संख्या ४० ते ५० इतकी आहे. त्यामुळे निकालातील गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. अशी बाब केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू (kiran rijiju) यांनी समोर आणली.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबादच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. शनिवारी (ता. ९) हा समारंभ झाला. (Maharashtra) यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठाचे कुलपती ए. एम. खानविलकर, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठ महासभेचे सदस्य ऋषिकेश रॉय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तथा प्र-कुलपती दीपांकर दत्ता, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबादचे कुलगुरु डॉ. के. व्ही. एस. सरमा, न्यायमुर्ती प्रसन्न वऱ्हाळे, न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला, कुलसचिव अशोक वडजे यांची उपस्थिती होती.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती सुजाता मनोहर, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती तथा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षा रंजना देसाई, केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश अरविंद सावंत यांना मानद एलएलडी प्रदान करण्यात आली. सुरवातीला जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना दोन मिनिट उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

किरेन रिजिजू म्हणाले, वाढत्या खटल्यांविषयी न्यायाधीशांना सांगितले आहे की, काही प्रकरणे लवादात मिटवावीत, त्यानंतर महत्वाचे खटलेच दाखल करुन घ्यावेत. यावेळी मीडिया ट्रायलही लक्षात घ्यावी, जेणेकरून कोर्टाचा वेळ वाया जाणार नाही. लवादासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘मिडीएशन लॉ’आणत आहे. तसेच काही वकील मोफत खटला लढतात मात्र, काहींचे शुल्क सामान्यांना परवडणारे नसते. न्यायापासून सर्वसामान्य माणूस वंचित राहू नये, ही आपली भूमिका असली पाहिजे.

Central Minister Kiran Rijiju
Santosh Bangar : आम्ही केलेली युती पाहून बाळासाहेबांनीही पुष्पवृष्टी केली असले..

वकिली क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या लंडनस्थित घराला भेट द्यावी, तिथे प्रेरणा मिळेल, असे किरेन रिजिजू म्हणाले. तसेच ‘एलएलबी’शिक्षणावेळच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. माझ्या क्लासरुममध्ये तीन रांगा होत्या, पहिल्या रांगेतील न्यायमुर्ती झाले. दुसऱ्या रांगेतील प्रसिद्ध वकील झाले. तिसऱ्या रांगेतील माझ्यासारखे राजकारणी होतात. माझी रांग फारशी चांगली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहे कि, आपल्याला कुठल्या रांगेत बसायचे आहे.

मी आता इकडे उत्तेजित झालो आहे. याठिकाणी काही लोक सांगत होते कि शहराचे नाव बदलले आहे. त्यामुळे मी संभ्रमात आहे कि, औरंगाबाद म्हणू कि संभाजीनगर म्हणू. महाराष्ट्र सरकारने शहराचे नाव नुकतेच बदलले आहे मात्र अधिसूचना नसल्याने औरंगाबादच म्हणेन, असे स्पष्टीकरण किरेन रिजिजू यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in