
औरंगाबाद : गंगापूर-खुल्ताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. (Teacher) मुख्यालयी न राहता बहुतांश शिक्षक खोटी कागदपत्रं सादर करून घरभाडे घेतात, शासनाची फसवणूक करतात असा गंभीर आरोप बंब (Prashant Bamb) यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता.
तेव्हापासून बंब विरुद्ध शिक्षक असा संघर्ष सुरू आहे. तीन आठवडे झाले तरी हा वाद काही केल्या मिटत नाहीये. (Marathwada) बंब आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, तर शिक्षकांनी बंब यांना माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
यावर बंब यांनी गांधीगिरी करत मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचा सत्कार व पूजन करत भांडाफोड केला होता. पिढी बरबाद करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक व पदवीधर आमदार पाठीशी घालतात असा आरोप करत त्यांचे मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करत बंब यांनी शिक्षक व पदवीधर आमदारांना देखील अंगावर घेतले.
आता हेच शिक्षक व पदवीधर आमदार बंब यांच्या विरोधात आक्रमक झाले असून शिक्षकांच्या भव्य मोर्चा येत्या ११ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत काढण्याचे नियोजन करत आहेत. शहरातील आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालायपर्यंत शिक्षकांचा हा भव्य मोर्चा निघणार आहे.
त्याचे नेतृत्व शिक्षक आमदार विक्रम काळे, कपिल पाटील, पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण हे करणार आहेत. बंब यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आता शिक्षक आमदार व संघटनांनी सुरू केला असून त्याचाच भाग म्हणून या मोर्चाकडे पाहिले जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.