आता कसं, शिंदे साहेब म्हणतील तसं ; पहिल्यांदाच आमदार झालेल्या बोरनारेंचेही बंड...

पहिल्यांदाच आमदार झालेल्या बोरनारे यांनी घेतलेली ही रिस्क त्यांची भविष्यातील राजकीय वाटचाल अधिक उज्वल करते की मग याचा फटका त्यांना बसतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. (Mla Ramesh Bornare)
Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political Crisis
Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political CrisisSarkarnama

औरंगाबाद : वैजापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रा. रमेश बोरनारे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली, मतदारसंघात येऊन सभाही घेतली. वैजापूरच्या मतदारांनी देखील सरांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवले. (Aurangabad) पण जेमतेम अडीच वर्षांतच बोरणारे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला. (Aurangabad Latest Marathi News)

एकनाथ शिंदे यांच्या बंडातील शिलेदारांपैकी बोरनारे (Ramesh Bornare) हे देखील एक आमदार आहेत. दोन दिवसानंतर त्यांनी मतदारसंघातील आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबतच असल्याची माहिती दिली.(Marathwada) यावेळचे फोनवरील संभाषण देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

कार्यकर्ता त्यांना विचारतो साहेब कसं, तर ते म्हणाले आता शिंदे साहेब म्हणतील तंसच. मी शिंदे साहेबांसोबत आहे, तुम्ही कोणाबरोबर आहात असा प्रतिप्रश्न बोरणारे यांनी विचारला तेव्हा तो कार्यकर्ता म्हणाला, सर आम्ही तुमच्या सोबत. वैजापूर हा शिवसेनेचा जिल्ह्यातील मजबुत गड म्हणून ओळखला जातो. दिवंगत आमदार आर.एम.वाणी यांच्या रुपाने शिवसेनेला सर्वाधिक काळ या मतदारसंघावर पकड कायम राखता आली.

२०१४ मध्ये अनपेक्षितपणे या मतदारसंघात राष्ट्रवादीने बाजी मारली होती. भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी शिवसेनेच्या वाणी यांचा पराभव केला होता. शिवसेनेसाठी हा धक्का होता, त्यानंतर प्रकृती अस्वस्थ असल्याने वाणी यांनी आता आपण विधानसभा लढवणार नाही अशी भूमिका घेतली. माझ्या ऐवजी तत्कालीन शिवेसेनेचे तालुकाप्रमुख असलेले प्रा. रमेश बोरनारे यांना उमेदवारी द्या, असा आग्रह वाणींनी उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला होता.

उद्धव ठाकरे यांनी देखील वाणींच्या मागणीचा मान राखत बोरनारे यांना २०१९ मध्ये उमेदवारी दिली. वैजापूरकरांनी २०१४ मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करत बोरनारे यांना प्रचंड मतांनी विजयी केले. प्राध्यापक असलेले अभ्यासू आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. सभागृहात मतदारसंघातील पाणी, रस्ते, सिंचनाचे प्रश्न त्यांनी प्रभावीपणे सभागृहात मांडल्याचे देखील पहायला मिळाले.

Ramesh Bornare News, Aurangabad Latest Marathi News, Maharashtra Political Crisis
Shivsena : राष्ट्रवादी-काॅंग्रेसमुळे होणारे नुकसान उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही ..

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही त्यांचा संपर्क आला तो मतदारसंघातील रस्ते व इतर कामासांठी निधी मिळवण्याच्या निमित्ताने. शिंदेनी देखील बोरनारे यांना झुकते माप देत भरघोस निधी दिला. दोन-अडीच वर्षात कोट्यावधींचा निधी दिल्याने बोरनारे शिंदेचे भक्तच झाले. मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्धानट करायला देखील शिंदे वैजापूरात नुकतेच येऊन गेले. या सगळ्याचा परिपाक पुढे मोठ्या बंडात आणि त्यात बोरनारे यांच्या सहभागाने होईल अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती.

पहिल्यांदाच आमदार झालेल्या बोरनारे यांनी घेतलेली ही रिस्क त्यांची भविष्यातील राजकीय वाटचाल अधिक उज्वल करते की मग याचा फटका त्यांना बसतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तुर्तास बोरनारे यांच्या बंडावर मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते वेट अॅन्ड वाॅचच्या भुमिकेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in