आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील 17 आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस

लसीकरण मोहिमेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या (ZP) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) कारणे दाखवा नोटीसा बजावली आहे.
Covid Vaccination
Covid VaccinationSarkarnama

जालना : गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Covid-19) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण (Vaccination) मोहिमेस गती दिली जात आहे. मात्र, या लसीकरणात मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या जालना (Jalna) जिल्ह्यातील तीन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह 14 वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) कारणे दाखवा नोटीसा बजावल्याने जिल्हा आरोग्य विभागात एकाच खबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील (Department of Health) बेशिस्त कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Covid Vaccination
सोशल मिडियावर पुन्हा खोडसाळपणा; गृहविभागाचे तात्काळ चौकशीचे आदेश

एकाबाजूला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रोनने राज्यात वेगाने शिरकाव केला आहे. त्यातच आरोग्यमंत्र्याच्या जालना जिल्ह्यातही या विषाणूचा रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सोमवारीच याबाबत आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी शासनाकडून कसोशीनचे प्रयत्न केले जात आहे. ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

Covid Vaccination
लतादीदींना न्युमोनियाचीही लागण ; 'ब्रीच कॅंडी'त उपचार, 'लवकर बरे व्हा' वाळूशिल्पातून प्रार्थना

दरम्यान, लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी आणि काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई करत कमालीचा हलगर्जीपणा असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने अंबड, मंठा, घनसावंगी येथील तालुका आरोग्य अधिकारी तसेच, गोंदी, शहागड, सुखापुरी, वाकुळणी, सोमठाणा, राजूर, राजा टाकळी, डोंणगाव खासगाव, वरुड, रामनगर, तळणी, ढोकसाळ, पाटोदा या 14 आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावली आहे. तर, या नोटीसीला तीन दिवसांत लेखी स्वरूपात खुलासा सादर करण्याचे आदेशही या नोटीशीत देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com