
Marathwada : ज्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्या महाराष्ट्र द्वेष्ट्या (Karnataka Assembly Election) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या प्रचाराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातात ही लाजीरवणी बाब आहे. पण त्यांनी कितीही भाजपच्या पालख्या वाहिल्या तरी याच कर्नाटकातून भाजपच्या पराभवाला सुरुवात होणार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली.
बारसू रिफायनरी प्रकल्पासह मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या कर्नाटकातील प्रचार दौऱ्यावर दानवे यांनी आपली भूमिका मांडली. अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकात आपले उमेदवार दिले आहेत. (Shivsena) ते सगळे मराठी आहेत, अशावेळी (Maharashtra) महाराष्ट्राने मराठी बांधवांना पाठबळ दिले पाहिजे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी बांधवाच्या विरोधात महाराष्ट्रद्वेष्ट्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची पालखी वाहण्याचे काम करत आहेत.
ज्यांनी बेळगाव महापालिकेवरचा भगवा खाली उतरवला, ज्यांनी तिथल्या मराठी बांधवावर अन्याय केला त्यांचा प्रचार आपले मुख्यमंत्री करत आहेत, ही शरमेची बाब आहे. पण कितीही पालख्या वाहिल्या तरी भाजपच्या पराभवाची सुरूवात या कर्नाटकातूनच होणार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे निघत आहेत, कोकणातील बारसू प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांवर लाठ्या चालवल्या जात आहेत, निर्दोष नागरिकांना तडीपारीच्या नोटीसी बजावल्या जात आहेत. ही एक प्रकारची हुकूमशाही आहे.
इकडे महाराष्ट्रात हे सुरू असतांना मुख्यमंत्री तिकडे कर्नाटकात प्रचार करतात हे चित्र राज्याला न शोभणारे आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असतांना तो रेटण्याचा प्रयत्न कुणासाठी केला जातोय? तिथे गुप्ता, शर्मा, वर्मांच्या जमिनी कुठून आल्या? ते कोकणी आहेत का? असा सवाल करत याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील दानवे यांनी यावेळी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.