निर्भयांचा आक्रोश सरकाच्या कानी पडत नाही, आता महिलांनीच कायदा हातात घ्यावा का?

(Mp Raksha Khadse Said,Ministers in the government do not see the increasing incidence of violence against women in the state.)महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला सत्तेत रहाण्याचा अधिकारच नाही
Mp Raksha Khadse
Mp Raksha KhadseSarkarnama

औरंगाबाद ः बीड, साकीनाका, परभणी , डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या. तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही. महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्व सुरक्षेसाठी स्वत:च कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकार प्रमाणे त्यांनीही घरातच बसून रहायचे? असा सवाल भाजप खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला.

महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला सत्तेत रहाण्याचा अधिकारच नाही, असेही त्या म्हणाल्या. औरंगाबाद येथे भाजप विभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

रक्षा खडसे म्हणाल्या, ह्या सरकारने दोन वर्षे महिला सुरक्षेसंदर्भात केवळ घोर निराशा आणि फसवणूक केली. ज्या शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देऊन सन्मानाने घरी पाठवले, त्या छत्रपतींचा दाखला वेळोवेळी देणा-या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यच रोजच महिलांचा अवमान करताना दिसत आहेत.

महिलांच्या सुरक्षेसाठी तत्कालिन गृहमंत्र्यांनी २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा आणण्याची घोषणा केली होती. तो कायदा अजूनही लागू झालेला नाही, महिला अत्याचार प्रश्नी रान उठल्यानंतर जवळपास दीड वर्षांने सरकारला महिला आयोग अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा मुहूर्त सापडला. वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन असो अथवा भाजपाच्या १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र असो प्रत्येक वेळी भाजपाने धक्का दिल्याशिवाय सरकारची गाडी हलत नाही, अशी परिस्थीती आहे.

मोदी सरकारकडून महिला सबलीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर २०२० साली नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली . त्यानुसार महिलांवरील अत्याचाराचा एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई, बलात्काराचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात एफआयआर नोंदवण्यात हलगर्जी, पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात टाळाटाळ होते, असा आरोप देखील रक्षा खडसे यांनी केला.

महिला अत्याचारांच्या असंख्य घटना घडत असताना सरकारमधील मंत्र्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने राजीनामा द्यावा लागला. तर दुसरे मंत्री सेलिब्रिटींच्या मुलाच्या अटकेविरोधा ,जावयावरील कारवाई विरोधात पत्रकार परिषदा घेण्यात आणि वायफळ चर्चा करण्यात मग्न असल्याचा टोलाही खडसे यांनी नवाब मलिक याना लगावला.

Mp Raksha Khadse
राणा पाटलांचे विश्वासू दत्ता बंडगर शिवसेनेत ; भाजपला दणका

लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी युवा प्रदेशाध्यक्ष यांच्यावर सत्तेचा गैरवापर करत महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. लखीमपूर प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देणा-या सरकारमधील मंत्र्यांना राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना दिसत नाहीत. महाराष्ट्र बंदसाठी जितकी यंत्रणा कामाला लावली गेली, तितकी मेहनत जर महिला सुरक्षेसाठी केली असती तर लेकीसुनांना सुरक्षित वाटले असते, असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com