Devendra Fadanvis News : निलंगेकरांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न पुर्ण करणार, फडणवीसांनी केली मोठी घोषणा..

Marathwada : पश्चिमेकडील वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे म्हणजेच मराठवाड्यासाठी आणणे महत्त्वाचे असून या वर्षातच हे काम पूर्ण करणार.
Let. Shivajirao Nilangekar Memorial News, Latur
Let. Shivajirao Nilangekar Memorial News, LaturSarkarnama

Latur : मराठवाड्याच्या विकासाची तहाण मोठी आहे, समाजाच्या व्यतिरिक्त विकास हाच एकमेव ध्यास कै. माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांचा होता. त्यामुळे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे त्यांचे स्वप्न पुर्ण करणे हीच त्यांनी खरी श्रद्धांजली ठरेल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निलंग्यातून आज मोठी घोषणा केली.

Let. Shivajirao Nilangekar Memorial News, Latur
Sanjay Bansode News : जनता नव्या सरकारला कंटाळली, महाविकास आघाडीचे दोनशे आमदार निवडून येतील..

पश्चिमेकडील वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे म्हणजेच मराठवाड्यासाठी आणणे महत्त्वाचे असून २०२३ या वर्षातच हे काम पूर्ण करणार असल्याचे सांगत त्यासाठी ३५ हजार कोटीच्या कामाच्या निविदा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण, जंयती या निमित्ताने मराठवाड्यासाठी ठोस अशी घोषणा फडणवीसांनी (Devendra Fadanvis) निलंग्यातून करावी, अशी विनंती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी आपल्या भाषणात केली होती.

तोच धागा पकडत फडणवीसांनी मोठी घोषणा करत निलंगेकरांची मागणी मान्य केली. फडणवीस म्हणाले की, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे अतिशय निष्ठावंत, नम्र, शांत या मातीशी नाळ जुळलेले नेतृत्व होते. स्वातंत्र्यानंतर देशभक्ती व विकास अशा मंतरलेल्या पिढीचे नेतृत्व त्यांनी केले असून मराठवाडा, कोकण, विदर्भ अशा भागात सिंचनाच्या सुविधा त्यांनी निर्माण केल्या.

पश्चिमेकडील वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे म्हणजेच मराठवाड्यासाठी आणणे महत्त्वाचे असून या वर्षातच हे काम पूर्ण करणार आहे. यासाठी ३५ हजार कोटीच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. शिवाय मराठवाड्याचा विकास हीच दादासाहेबांना खरी श्रध्दांजली ठरेल. शेतीच्या उन्नतीसाठी पाण्याची गरज लागते हे हेरून शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला.

मोठं मन सर्वासोबतआपुलकी असा त्यांचा स्वभाव होता. माझ्यापेक्षा जेष्ठ असले तरी शेवटपर्यंत त्यांनी मैत्री जपण्याचे काम केले, असे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजीमंत्री दिलीपराव देशमुख, संजय बनसोडे, यशोमती ठाकूर यांनीही आपल्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com