नीलम गोऱ्हेंचे तुळजाभवानीला साकडे : चांदीच्या पादुका केल्या अर्पण

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नीलम गोऱ्हे ( Dr. Nilam Gorhe ) यांनी तुळजाभवानी मातेचरणी चांदीच्या पादुका अर्पण केल्या.
Dr. Nilam Gorhe
Dr. Nilam GorheSarkarnama

तुळजापूर - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर आज अंमलबजावणी संचालनालयाकडून कारवाई सुरू असताना शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे या तुळजापूरला होत्या. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी तुळजाभवानीला साकडेही घातले. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नीलम गोऱ्हे ( Dr. Nilam Gorhe ) यांनी तुळजाभवानी मातेचरणी चांदीच्या पादुका अर्पण केल्या. Shivsena News Update

या संदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेने शिवसेनेला तसेच आम्हाला न मागता खूप काही दिले आहे. विरोधकांना उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील हे मान्य नव्हते, पण जनता जनार्दनाच्या शक्तीमुळे ते साध्य झाले आहे. देशाच्या राजकारणात ठाकरे घराण्याचा प्रभाव कायम राहील. अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

Dr. Nilam Gorhe
video : साकीनाका बलात्कार प्रकरणी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत : डॉ. नीलम गोऱ्हे

त्या पुढे म्हणाल्या की, तुळजाभवानी मंदिर संस्थानला जे कायदे लागू आहेत ते स्पष्ट होत नाहीत. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे. मंदिरात शिवकालीन दागिना किंवा नाणी गायब प्रकरणी बाबतचा चौकशी अहवाल जनतेसमोर यायला हवा. मंदिर समिती सोयीस्कर मंदिर संस्थान या नियमावली बदल करून नवीन पायंडा पडतो याबाबतीत मंदिर समिती, जिल्हाधिकारी,तसेच विभागीय आयुक्त यांच्यासह लोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक घेणार आहे. शहरविकास प्राधिकरण असो वा मंदिरात विविध समस्या किंवा विकासात्मक धोरणात बदल यासाठी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुळजाभवानी मंदिरात सर्वसामान्य भक्तांना राज्यातील तीर्थक्षेत्राप्रमाणात सुलभ दर्शन व्यवस्था बाबत सूचना देण्यात येतील. भाविकांमध्ये दुजाभाव करू नये. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने नियम सतत बदलू नयेत. तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, व पंढरपूर बाबत पर्यटनवाढीसाठी काम झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Dr. Nilam Gorhe
राणा यांचा राजकीय प्रवास भाडोत्रीटॅक्सी प्रमाणे ; नीलम गोऱ्हे यांचा टोला

आपल्या जिल्ह्यातील काही लोकांची दिल्ली पर्यंत पोच असल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अन्याय होत आहे. अद्याप वडिलांच्या हत्या प्रकरणी न्याय मिळत नाही. तसेच लातूरच्या कल्पना गिरी हत्या प्रकरणात त्या कुटुंबाला ही अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही. राज्यातील शेतकरी बांधवांना तातडीने मदत करावी,स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती दिली पाहिजे. महिला बचत गटांचे प्रश्न असो वा महिला अत्याचाराच्या प्रश्नी तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी दर्शनानंतर मंदिर समितीतर्फे तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर व्यवस्थापक योगिता कोल्हे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, महिला जिल्हा प्रमुख शामल वडणे, सोलापूर जिल्हा महिला संघटक अस्मिता गायकवाड, माजी उपजिल्हा प्रमुख श्याम पवार, शहर प्रमुख सुधीर कदम, बाळासाहेब शिंदे, प्रा.शंकर लोभे, सुनील जाधव, विकास भोसले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in