Nilam Gorhe News : हक्कभंगावर तुर्तास निर्णय नाही, संजय राऊत सात दिवसात खुलासा करणार..

Maharashtra : राज्यसभेच्या सभापतींना विधान परिषदेच्या सभापतींकडून चौकशीचा प्रस्ताव पाठवण्याची प्रथा आहे.
Nilam Gorhe-Sanjay Raut News, Vidhan Parishad
Nilam Gorhe-Sanjay Raut News, Vidhan ParishadSarkarnama

Budget Session : राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळ म्हणजे चोर मंडळ आहे, असे विधान केले होते. त्यानंतर सभागृहाने त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव माझ्याकडे दिला होता. या हक्कभंग प्रस्तावावर अभ्यास करून तो समितीकडे पाठवण्यात येईल. तत्पुर्वी संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक वाटते.

Nilam Gorhe-Sanjay Raut News, Vidhan Parishad
Eknath Shinde News : मी अजितदादांना देशद्रोही म्हणालो नव्हतो, मलिकांचा देशद्रोह्यांशी संबंध, ते बोलणारच..

त्यामुळे येत्या ७ दिवसांत संजय राऊत यांचा खुलासा मागवण्यात येईल. त्यानंतर हक्कभंगाच्या कारवाईवर विचार केला जाईल, असा निर्णय विधान परिषदेच्या उपसभापती (Nilam Gorhe) डाॅ. निलम गोऱ्हे यांनी दिला. (Sanjay Raut) संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे अशा प्रकरणांमध्ये राज्यसभेच्या सभापतींना विधान परिषदेच्या सभापतींकडून चौकशीचा प्रस्ताव पाठवण्याची प्रथा आहे.

त्यानूसार संजय राऊत यांचा सात दिवसांत खुलासा आल्यानंतर त्याचा अभ्यास करून राज्यसभेच्या सभापतींकडे चौकशी आणि कारवाई संदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केल. संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोर मंडळ म्हटल्याबद्दल त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी सत्ताधारी पक्षाचे आमदार राम शिंदे, प्रवीण दरेकर यांच्याकडून करण्यात आली होती. या प्रस्तावावर काल सभागृहात नीलम गोऱ्हे यांनी आज निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहापानावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्काराच्यानंतर पत्रका परिषदेत बरे झाले देशद्रोह्यांबरोबर चहापान टळले असे विधान केले होते. त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली होती. यावर आज मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सभागृहात आपला खुलासा केला.

त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्याविरोधातील हक्कभंग न स्वीकारता तो समितीकडे अभ्यासासाठी पाठवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. समितीच्या अहवालानंतर हक्कभंग स्वीकारायचा की नाही? यावर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com