Nilam Gorhe News : नवे महिला धोरणात अंमलबजावणी करणारे कायदे असावेत..

Vidhan Parisahd : आॅनर किलिंग, सोशल मिडियावर बदनामी, अवैध गर्भपात, महिलांवर अत्याचार करून त्यांचे तुकडे करण्याचे प्रकार घडत आहेत.
Dr. Nilam Gorhe News
Dr. Nilam Gorhe NewsSarkarnama

Womens Day : राज्यात पहिले महिला धोरण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आणले. त्यानंतर वेळोवेळी गोपीनाथ मुंडे, लीलाधर डाके यांनी देखील या विषयावर मोठे काम केले. (Nilam Gorhe) महिलांना पुरूषांप्रमाणे हक्क देण्याचा प्रयत्न झाला. २००१ मधल्या धोरणांतून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, आता पुन्हा नवे महिला धोरण आणले जात आहे.

Dr. Nilam Gorhe News
Maharashtra Assembly News: महिला दिनीच विधानसभेत महिला आमदार कडाडल्या : काय आहे कारण?

जागतिक महिलादिनी (Women) यावर प्रस्ताव आणला जात आहे, ही आनंदची बाब आहे. मात्र हे करत असतांना अजूनही महिलांच्या बाबतीतले अनेक प्रश्न गंभीर आहेत, ते सोडवण्याच्या दृष्टीने नव्या महिला धोरणात कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे कशी होईल? (Maharashtra) याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

आज जागतिक महिला दिनी निलम गोऱ्हे यांनी नव्या महिला धोरणाचा प्रस्ताव मांडला. यावर बोलतांना गोऱ्हे म्हणाल्या, महिलाविषयक २०१४ च्या धोरणामध्ये अनुसुचित जाती-जमातींच्या महिलांच्या प्रश्नावर लक्ष दिले गेले. अजूनही महिलांचे अनेक प्रश्न सुटू शकलेले नाहीत. आॅनर किलिंग, सोशल मिडियावर बदनामी, अवैध गर्भपात, महिलांवर अत्याचार करून त्यांचे तुकडे करण्याचे प्रकार घडत आहेत.

त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये संबंधितावर कठोर कारवाई करणारे, त्याची अंमलबजावणी करणारे कायदे असावेत. राज्यामध्ये कोविड काळात कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्यामुळे अडीच लाख महिला विधवा झाल्या. १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे अशा कुटुंबातील निराधार महिलांना मदतीची गरज आहे. बालविवाहांचे प्रमाण, मुलींच्या अपहरणाचे प्रकार देखील याच काळात वाढले. या पार्श्वभूमीवर नवे महिला धोरण करतांना सगळ्यांच्या सूचना घेवून चांगले धोरण आणले जाईल अशी अपेक्षा गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

डीपीडीसी प्रमाणे महिलांचे प्रतिनिधी फोरम प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. शंभर महिलांचे फोरम व दर महिन्याला बैठक घेवून महिलांच्या समस्यांचा आढावा यामाध्यमातून घेतला जावा, संवादी पद्धतीने या बैठका व्हाव्यात. महिला धोरणासंदर्भात बैठका होत नाहीत, अशा फोरमच्या माध्यमातून महिलांना आपले विचार मांडण्याची संधी मिळेल, असेही गोऱ्हे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com