Pradnya Satav Attack Update: प्रज्ञा सातव हल्ला प्रकरणी नवी अपडेट; पोलीस अधीक्षकांनी सांगितलं हल्लेखोराचं सत्य...

काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर गेल्या महिन्यात जीवघेणा हल्ला झाला होता.
Pradnya Satav
Pradnya SatavSarkarnama

Pradnya Satav Attack Update: काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर गेल्या महिन्यात जीवघेणा हल्ला झाला होता. सुदैवाने या हल्ल्यातून त्या सुखरुप बचावल्या. यावरुन राजकारण बरचं तापलं होतं. पोलिसांनी तातडीनं संबंधित आरोपीला अटकही केली होती. आता या प्रकरणी आता नवी अपडेट समोर आली आहे.

कोणत्याही राजकीय हेतूने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला नव्हता. तसेच त्यांच्यावर हल्ला करणारा आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. दारूच्या नशेत त्याने गुन्हा केला, असे तपासात स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली आहे.

Pradnya Satav
Raju Shetti News : राजू शेट्टी यांच्या 'स्वाभिमानी'ला सोबत घेण्याचे चंद्रकांतदादांचे प्रयत्न निष्फळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी शेळीपालन व मोलमजुरी करतो. दारू पिण्याच्या सवयीमुळे घरात त्याचे नेहमीच वाद होत असतात. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधही नाही. तसेच,त्याने कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केलेला नाही. दारुच्या नशेत त्यांच्याकडून हा गुन्हा घडल्याचे तपासातून समोर आले आहे. यासंबंधीचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे.असेही जी. श्रीधर यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा हल्ला झाला होता. याप्रकरणी महेंद्र तुकाराम डोंगरदिवे या हल्लेखोराला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याची परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com