काकांनी दिलेला शब्द पुतण्याने खरा केला; शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने पाच लाखांचे कर्ज..

पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय शेतकरी बांधवांना जितके समाधान देणारा आहे, तितकेच समाधान बँकेचा अध्यक्ष या नात्याने मलाही आहे. (Dhiraj Deshmukh)
Dhiraj Deshmukh-Diliprao Deshmukh

Dhiraj Deshmukh-Diliprao Deshmukh

Sarkarnama

लातूर ःलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पीक कर्ज देणार, असा ऐतिहासिक निर्णय माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी (Marathwada) सर्वसाधारण सभेत काही महिन्यांपूर्वी जाहीर केला होता. (Mla Dhiraj Deshmukh) या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बँकेच्या नूतन संचालक मंडळाने घेतला आहे. (Latur) त्यानुसार बँकेने पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पीक कर्ज वाटप सुरु केले आहे.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व पाठींब्याने माझी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आम्ही सर्वांनी घेतलेला हा पहिला निर्णय आहे. यापुढेही आम्ही शेतकरी बांधव व सर्वसामान्यांच्या हिताचे वेगवेगळे निर्णय घेऊ आणि आपल्या आशा-अपेक्षांवर खरं उतरून दाखवू.

पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय शेतकरी बांधवांना जितके समाधान देणारा आहे, तितकेच समाधान बँकेचा अध्यक्ष या नात्याने मलाही आहे, अशा भावना जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी व्यक्त केल्या. लातूर जिल्हा बॅंकेची यंदाची निवडणूक राज्यभरात गाजली ती विविध वादांमुळे.

विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचे प्रकरण थेट उच्च न्यायालयात गेले होते. संभाजी पाटील निलंगेकर यांनी तर भाजप उमेदवारांचे अर्ज बाद करण्यासाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयातूनच फोन आला होता, असा आरोप देखील केला.

या सगळ्या घडामोडी आणि राजकीय संघर्षानंतरही भाजपला केवळ ईश्वर चिठ्ठीमुळे जिल्हा बॅंकेत एन्ट्री करता आली. अन्यथा काॅंग्रेसच्या पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले असते. या निवडणुकीत शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे कर्ज ते ही शून्य टक्के दराने देण्याचा मुद्दा देखील चांगलाच गाजला होता.

<div class="paragraphs"><p>Dhiraj Deshmukh-Diliprao Deshmukh</p></div>
एक लाखाची लाच घेतांना शेतकरी संघटनेचा अध्यक्ष, पुरवठा अधिकारी जाळ्यात

संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावरून दिलीपराव देशमुख यांच्यावर टीकाही केली होती. या निवडणुकीत आणखी एक विशेष घटना घडली होती, ती म्हणजे काका दिलीपराव देशमुख यांनी बॅंकेच्या राजकारणातून स्वतःला बाजूला करत पुतणे आमदार धिरज देशमुख यांच्याकडे कारभार सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

मार्गदर्शक म्हणून कांकाचे मार्गदर्शन पुतण्याला लाभाणार असले तरी कारभारी पुतण्याच असणार आहे. पण निवडणुक प्रचाराच्यावेळी काकांनी शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने देण्याचा दिलेला शब्द बॅंकेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर पुतण्या धिरज देशमुख यांनी पुर्ण करून दाखवला असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com