Mla Solanke- Pandit
Mla Solanke- PanditSarkarnama

राष्ट्रवादीच्या सोळंके - पंडितांचे पॅचअप : आता वाटचाल कोणत्या दिशेने?

प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीतील जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ नेते आणि आमदार आहेत. (Beed Ncp)

बीड : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Mla prakash solanke) आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित (amarsinh pandit) यांच्यात अखेर पॅचअप झाले. मुंबईत मनोमिलनानंतर लगेचच प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या माजलगाव मतदार संघातील कार्यक्रमाचेही अमरसिंह पंडितांना निमंत्रण दिले. (Marathwada) त्यानंतर सार्वजनिकरित्या दोघे अनेक महिन्यांनी एका व्यासपीठार दिसले. आता दोघांचे पॅचअप नेमके कोणत्या मुद्द्यावर आणि वाटचाल कोणत्या दिशेने ते पहावे लागणार आहे.

प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीतील जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ नेते आणि आमदार आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बाळासाहेब आजबे व संदीप क्षीरसागर हे तिघेही पहिल्यांदाच विधानसभेला विजयी झालेले आहेत. जेष्ठत्व आणि यापूर्वीचा राज्यमंत्रीपदाचा अनुभव या जोरावर मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी प्रकाश सोळंके यांनी टोकाचे प्रयत्न केले. परंतु, पक्षाने धनंजय मुंडे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची आणि पालकमंत्रीपदाची माळ घातली.

त्यामुळे ओपनिंगलाच प्रकाश सोळंके यांनी राजीनामअस्त्र उगारुन पक्षालाही जेरीस आणले होते. या राजीनामा अंकावर पडदा टाकून पक्षात व सोळंके यांच्यात पॅचअप करण्यात अमरसिंह पंडित यांची महत्वाची भूमिका राहीली. नंतर मात्र दोघांमध्ये चांगलेच बिनसले. दोघे एकाच पक्षातले, एकाच जिल्ह्यातले, दोघांचे मतदार संघही खेटून आणि दोघेही मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे महत्वाचे पदाधिकारी. परंतु, दोघांमधून विस्तव आडवा जात नव्हता.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत दोघांच्या भूमिकांमध्ये टोकाचा बदल होता. प्रशासक मंडळाच्या नेमणूकीतही अमरसिंह पंडित यांच्या भूमिकेविरुद्ध सोळंके यांनी टोकाची ताकद वापरली. तसे, अलिकडे सोळंके यांची गाडी जिल्ह्यात फारसे कोणाला न जुमानता वेगातच धावत आहे. मंत्रालयात आणि पक्षातही त्यांचा शब्द टाळण्याचे धाडस फारसे कोणी करत नाही.

Mla Solanke- Pandit
भीमा कोरेगाव हिंसाचार: सुधा भारद्वाजांच्या जामीनाला आव्हान

तसे, अमरसिंह पंडित यांचेही जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी थेट संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याही शब्दाला पक्षात व मंत्र्यांजवळ चांगला मान आहे. त्यामुळे कदाचित दोघांची ताकद एकमेकांच्या विरोधात वापरण्याऐवजी एकमेकांच्या हितासाठी वापरण्याचा विचार झाला असावा. दोघांच्या मतदार संघांच्या सिमाही एकत्र आहेत आणि राजकीय सिमाही ठरलेल्या आहेत.

सोळंके यांना मंत्री व्हायचेय तर पंडितांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर जायचेय. त्यामुळे कदाचित स्थानिक पातळीवर भांडत बसण्यापेक्षा एकमेकांच्या हातात हात घालून वाटचाल करु, असा विचार आला आणि मागच्या आठवड्यात दोघे मुंबईत भेटले. यानंतर मतदार संघात बोलावून प्रकाश सोळंके यांनी अमरसिंह पंडित यांचा पाहुणचारही केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com