टोपेंच्या घनसावंगीत राष्ट्रवादीची सत्ता, मंठ्यात शिवसेनेचा भगवा फडकला

निवडून आलेले अपक्ष उमेदवार दोघेही भाजपचे समर्थक असल्यामुळे आमदार नारायण कुचे यांनी नगरपंचायतीवर निर्विवाद यश मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. (Jalna District)
Tope-Kuche-Borade
Tope-Kuche-BoradeSarkarnama

जालना : जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून नव्यानेच स्थापन झालेल्या तीर्थपुरी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणकीत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे. (Ncp) या शिवाय राज्याचे आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आपल्या घनसावंगी नगरपंचायतीत एक हाती सत्ता मिळवली आहे. (Shivsena) मठा नगरपंचायतीत सर्वाधिक जागा जिंकत शिवसेनेने भगवा फडकवला, तर भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी आपल्या बदनापूर मतदारसंघातील नगरपंचायत राखली आहे. (Jalna)

जाफ्राबादचे भाजप आमदार संतोष दानवे यांना मात्र अपयश आले आहे. जाफ्राबाद नगरपंचायत निवडणुकीत भाजपला फक्त एक जागा जिंकता आली. या ठिकाणी काॅंग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या, तर चार अपक्ष विजयी झाले आहेत. तीर्थपुरी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ११ जागांवर विजय मिळवित सत्ता काबीज केली.

येथे भाजप २, शिवसेना ३, तर अपक्षाने एका जागेवर विजय मिळविला. घनसावंगी नगरपंचायतीवर १७ पैकी १० जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम राखले. विशेष म्हणजे शिवसेनेनेही इथे सात जागांवर विजय मिळविला. बदनापूर नगरपंचायतीत भाजपने ९ जागांवरील विजयांसह एकहाती सत्ता मिळविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ५, काँग्रेस एक तर अपक्षांनी २ ठिकाणी विजय मिळविला.

निवडून आलेले अपक्ष उमेदवार दोघेही भाजपचे समर्थक असल्यामुळे आमदार नारायण कुचे यांनी नगरपंचायतीवर निर्विवाद यश मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. मंठ्यात शिवसेनेची एकजागा आधीच बिनविरोध निवडून आली होती. उर्वरित सोळा जागांमध्ये शिवसेनेने अकरा, काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने प्रत्येकी दोन व राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. इथे शिवसेनेला बहुमतासह सत्ता मिळाली. जिल्हाप्रमुख बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना इथे लढली होती.

Tope-Kuche-Borade
केजमध्ये आडसकरांची खेळी यशस्वी; रजनी पाटलांना धक्का

जाफराबाद नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला प्रत्येकी सहा, तर भाजपला एका जागेवर विजय मिळवता आला आहे. चार अपक्ष निवडून आल्यामुळे सत्ता स्थापनेत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com