राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची डाॅक्टर मुलगीही निवडणुकीच्या रिंगणात

बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉ. हर्षदा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुक रिंगणात आहेत. डॉ. हर्षदा पुणे येथील काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. (Ncp Beed)
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची डाॅक्टर मुलगीही निवडणुकीच्या रिंगणात
Bajarang Sonawane- Dr. Harshada SonawaneSarkarnama

बीड : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या हर्षदा ही देखील नगरपंचायतीच्या निवडणुक रिंगणात उतरली आहे. (Ncp)वैद्यकीय शिक्षण घेणारी हर्षदा एमबीबीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा तोंडावर असतानाच नगर पंचायतीच्या निवडणुकीत देखील आपले नशिब आजमावत आहे.

जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या प्रत्येकी चार जागांसाठीच्या निवडणुका होत आहेत. (Beed) ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी राखीव जागांवरील निवडणुक प्रक्रीया थांबली होती. (Nagar Panchayat Election) आता या जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटल्या आहेत. त्यासाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील केज, वडवणी, शिरुर कासार, आष्टी व पाटोदा या नगर पंचायतींमधील प्रत्येकी चार जागांसाठी निवडणुक होत आहे. केज हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे व काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचे होमपिच आहे.

या ठिकाणी महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आमने - सामने आहे. भाजपचे चिन्ह या ठिकाणी गोठलेले आहे. मात्र, स्थानिक आघाडीनेही या ठिकाणी रंगत आणलेली आहे. दरम्यान, सध्या चार पैकी दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. यात वार्ड क्रमांक दोन हा जिल्हाध्यक्ष सोनवणे व खासदार पाटील यांचाच वार्ड आहे.

Bajarang Sonawane- Dr. Harshada Sonawane
बारा आमदारांचा आज फैसला; भातखळकर, महाजन, सातपुते विधानभवनात येणार नाहीत

या ठिकाणी बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉ. हर्षदा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात डाॅ.कविता कराड या तगड्या उमेदवार आहेत. त्या संस्थाचलाक आणि पाटील कुटुंबियांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. काॅंग्रेस महिला आघाडीच्या अनेक वर्ष त्या तालुकाध्यक्ष असून राजकारणात सक्रीय आहेत. तर डॉ. हर्षदा पुणे येथील काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. महिना अखेरीस अंतिम वर्षाची परीक्षा असतांना त्याआधीच हर्षदा निवडणुकीच्या कसोटीला सामोरे जात आहे.

वडिल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, तर आई सारिका सोनवणे या देखील जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. आता त्यांची कन्याही नगर पंचायतीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. जिल्ह्याला महिला नेत्यांची उच्च परंपरा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून लोकसभेपर्यंत जिल्ह्यातील महिलांना संधी मिळालेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.