शिवसेना आमदाराला मुंबईत घर घेण्यासाठी राष्ट्रवादीने केले भीक मागो आंदोलन...

Shivsena|Uday Singh Rajput|Harshvardhan Jadhav: शिवसेना आमदार उद्यसिंग राजपूत यांच्या विरोधात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही भीक मागो आंदोलन केले आहे.
NCP, Aurangabad
NCP, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) मुंबईत सर्वपक्षीय आमदारांना घर देण्याच्या मुद्यावरून राजकीय चांगलेच वातावरण तापले आहे. मुंबईत आमदारांना घर मागणारे कन्नड तालुक्याचे शिवसेना (Shivsena) आमदार उदयसिंह राजपूत (UdaySingh Rajput) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) भीक मागो आंदोलन करण्यात आले आहे. विधानसभेत राजपूत यांनी आमदारांना घर देण्याची मागणी केली होती.

NCP, Aurangabad
आमदारांच्या मुंबईतील घरांसाठी माजी आमदाराने फाटके कपडे घालून भीक मागितली...

कन्नड राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राजपूत यांच्याविरोधात आक्रमक भूमीका घेतली आहे. राजपूत यांचा निषेध करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून भीक मागो आंदोलन करण्यात आले. यातून जमा झालेल्या पैशातून राजपूत यांना घर देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. कन्नड तालुक्यातील अनेक बेघर लोकांना घरकुल मिळत नसून अनेक अर्ज प्रलंबित आहेत. असे असताना आमदार राजपूतांना मुंबईत घर हवे आहे. त्यामुळे त्यांना घर मिळून देण्यासाठी आमदार उद्यसिंग राजपूत यांच्या मुंबईतील घरकुलाच्या इच्छापूर्तीसाठी चला भीक घालूया असे तालुक्यातील अधिकारी, गुत्तेदार आणि तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांना आवाहन करण्यात आले आहे. भीक मागो आंदोलनातून जमलेल्या पैशातून राजपूतांना मुंबईत घर घेऊन देणार असल्याचे राष्ट्रवादीच्या आंदोलक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

याबाबत कन्नडमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आमदार राजपूतांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून होर्डिंग लावण्यात आले होते. 'गरिबांना घरकुल द्यायचं की नाही, नंतर पाहा पण मला मुंबईत घर द्या, तालुक्यातील अधिकारी, गुत्तेदार आणि तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांकडून भीक मागो आंदोलन,' असा उल्लेख होर्डिंगवर करण्यात आला होता. मात्र, राजपूतांनी याविरोधात पोलिसात धाव घेतल्याने हे होर्डिंग काढण्यात आले होते. मात्र, यावरून तालूक्यात आमदार राजपूत विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळत आहे.

NCP, Aurangabad
सरकारचं घुमजाव! आमदारांना घरे देण्याचा निर्णयच झाला नव्हता...

दरम्यान, राजपूतांच्या विरोधात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही भीक मागो आंदोलन केले. मुंबईत घर घेण्यासाठी आमदाराकडे पैसे नाही त्यामुळे 1-1 रुपया भीक द्या. राष्ट्रवादीच्या नावाने, शिवसेनेच्या नावाने, काँग्रेसच्या नावाने, आणि भाजपच्याही नावाने भीक द्या. सगळ्या सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत घर घ्यायचं आहे. भीक द्या, असे म्हणत जाधवांनी राजपूत आणि महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची खिल्ली उडवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com