दुर्राणींचे पंख छाटून, विटेकरांना बळ देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

(NCP's Parbhani district president MLA Babajani Durrani has resigned from his post) मागील काही दिवसापासून पक्षांतर्गत कलह टोकाला गेला, त्यातूनच दुराणी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.
Ncp Rajesh Vitekar-Mla Durani
Ncp Rajesh Vitekar-Mla DuraniSarkarnama

परभणीः राष्ट्रवादी कॉग्रेसचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा आठवडाभरापुर्वीच पक्षश्रेष्ठीकडे सुपूर्द केला आहे. या संदर्भात आज त्यांनी आपल्या राजीमाम्याची अधिकृत घोषणा केली. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे गावपातळीपासून चांगले वजन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जिल्हा परिषद राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ताब्यात आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसची जिल्ह्यात भक्कम ताकद उभी असतांना आणि त्या बाबाजानी यांचा सिंहाचा वाटा असतांना त्यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्रा आहे. मागील काही दिवसापासून पक्षांतर्गत कलह टोकाला गेला, त्यातूनच दुराणी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.

दुर्राणी यांच्या विरोधात दुसरा गट सक्रीय झाला आहे असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीतही पक्षातील गटबाजी समोर आली होती. राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झालेली असतांनाही आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी कॉग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या गटाला विरोध दर्शवित भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यागटाकडे आपली ताकद दिली होती.

त्यावरून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये अतंर्गत धुसपुस सुरू झाली होती. परभणीचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्याशीही बाबाजानी दुर्राणी यांचे संबंध चांगले नव्हते. यासर्व गटबाजीची माहिती पक्षश्रेष्टीपर्यंत गेली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यातही अनेकांनी याबद्दल नाराजी बोलून दाखवली होती. तेव्हापासूनच पक्षाच्या जिल्ह्यातील नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरु झाल्या होत्या.

दुर्राणी यांचे समर्थक असलेले प्रा. किरण सोनटक्के यांनाही शहर जिल्हाध्यक्षपदाऐवजी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे दुर्राणी यांच्या गटाची पदे हळुहळू काढली जात असल्याचे दिसून येत होते. या सर्व पार्श्वभूमीवर १६ नोव्हेंबर रोजी दुर्राणी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्टीकडे पाठवून दिला होता. प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी तो मंजुर केला की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Ncp Rajesh Vitekar-Mla Durani
बीडच्या जिल्हाधिकार्‍यांविरूध्द अटक वॉरंट

जयंत पाटलांनी दिले होते संकेत

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्याकडे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे. काही दिवसापूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजेश विटेकरांकडे मोठी जबाबदारी दिली जाईल असे सांगितले होते. त्यानंतर दुर्राणी व विटेकरांमध्ये धुसफुस सुरु होती.

दुर्राणी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राजेश विटेकर यांच्याकडे ही जबाबदारी जावू शकते. गेल्या काही दिवसांपासून विटेकर आणि दुर्राणी यांच्यात शहरातील एका इमारतीचे बांधकाम पाडण्यावरून देखील मोठा वाद झाल्याची माहिती आहे.

या संदर्भात विटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दुर्राणी यांची तक्रार केल्याचे देखील बोलले जाते. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, अजित पवार यांनी जिल्ह्याची सुत्रे तरुण नेतृत्वाच्या हातात सोपवण्याचे ठरवले आहे. शिवाय विटेकर हे अजित पवार यांच्या जवळचे समजले जातात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com