Ncp : ठोंबरेंना राष्ट्रवादीत प्रवेश देत माझे राजकारण संपवण्याचा सतीश चव्हाणांचा कट..

या सगळ्या राजकीय घडामोडी आणि माझा विरोध डावलून ठोंबरे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यामागे आमदार सतीश चव्हाण यांचेच कारस्थान आहे. ( Ncp, Aurangabad)
Aurangabad Ncp News
Aurangabad Ncp NewsSarkarnama

औरंगाबाद : ठोंबरेंच्या पक्ष प्रवेशाला माझा तीव्र विरोध होता, तसे मी पक्षाला लेखी देखील कळवले होते. पण तरीही काल प्रदेश राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठोंबरे व त्यांच्या समर्थकांना पक्षात प्रवेश दिला. वैजापूर तालुक्याच्या राजकारणात दोनवेळा मी अपक्ष म्हणून लढलो, तेव्हा मला लोकांनी ५० हजारांपेक्षा जास्त मते दिली. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय मी जनतेशी चर्चा करूनच घेणार असल्याचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगतिले.

Aurangabad Ncp News
Marathwada : चिकटगांवकरांचा विरोध, तरीही पंकज ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश..

मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी अशाच पद्धतीने पैठणमध्ये संजय वाघचौरे यांचे राजकारण संपवले, कन्नडमध्ये उदयसिंह राजपूत त्यांच्याच राजकारणाला कंटाळून पक्ष सोडून शिवसेनेत गेले होते. (Ncp) आता माझ्या बाबतीत देखील तोच प्रयोग सतीश चव्हाण करत असल्याचा गंभीर आरोप देखील चिकटगांवकर यांनी केला. (Aurangabad) भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या तीव्र विरोधानंतरही काॅंग्रेसचे विरगाव येथील जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, भाऊसाहेब ठोंबरे यांचा राष्ट्रवादीत काल प्रवेश झाला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ठोंबरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश केला. त्यानंतर वैजापूरमध्ये त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर हे राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असून येत्या पंधरा दिवसांत मतदारसंघाचा दौरा करत ते जनतेचे मत जाणून घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीत राहयचे की मग अन्य पक्षात जायचे याचा निर्णय जाहीर करणार आहेत.

या संदर्भात चिकटगांवकर म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यात राजकारण करतोय. राष्ट्रवादीत जाण्याआधी अपक्ष म्हणून दोनदा मी निवडणुक लढलो, तेव्हा लोकांनी मला ५० हजारांपेक्षा जास्त मतं देवून माझ्यावर विश्वास दाखवला होता. ठोंबरे यांच्या प्रवेशाने तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण होतील याची कल्पना वरिष्ठ नेत्यांना देत लेखी विरोध मी दर्शवला होता. त्यानंतरही काल ठोंबरे व त्यांच्या समर्थकांना पक्षात प्रेवश देण्यात आला आहे. त्यामुळे पुढे काय करायचे याचा निर्णय मी पंधरा दिवसांनी जाहीर करेल.

या सगळ्या राजकीय घडामोडी आणि माझा विरोध डावलून ठोंबरे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यामागे आमदार सतीश चव्हाण यांचेच कारस्थान आहे. पैठणमध्ये वाघचौरे आणि कन्नडमध्ये उदयसिंह राजपूत यांच्याबातीत त्यांनी हाच प्रयोग करत त्यांचे राजकारण संपवले होते. त्याच पद्धतीने वैजापूरमधून माझे राजकारण संपवण्याचा सतीश चव्हाण हे प्रयत्न करत असल्याचा आरोप चिकटगांवकर यांनी केला आहे. आता ज्या जनतेने मला मोठं केलं त्यांच्यासमोर जावून ते जे सांगतील तोच माझा अंतिम निर्णय असेल. त्यांनी ज्या पक्षात जायला सांगितले तिथे जाईन, ते म्हणाले अपक्ष लढा तर माझी ती देखील तयारी असेल, असेही चिकटगांवकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in