Ncp News : सतीश चव्हाण विधानसभेच्या तयारीला, बंब यांना देणार आव्हान ?

Satish Chavan : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने तरुण चेहरा म्हणून संतोष माने यांना उमेदवारी दिली होती.
Ncp Mla Satish Chavan News, Aurangabad
Ncp Mla Satish Chavan News, AurangabadSarkarnama

Marathwada : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तीनवेळा निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण आता विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत. गेल्या वर्षभरापासून (Gangapur-Khultabad) गंगापूर-खु्ल्ताबाद मतदारसंघातील त्यांच्या चकरा वाढल्या आहेत. नुकताच मतदारसंघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षण शिबीर आणि सत्कार कार्यक्रमात त्यांनी आपल्या तयारीचा प्रत्यय दिला.

Ncp Mla Satish Chavan News, Aurangabad
Shivsena : लग्नासाठी मुलगी मिळत नाही, तुमच्या सर्कलमध्ये पहा ना ; आमदार राजपूतांना तरुणाचा फोन..

गेल्या विधानसभा निवडणुकीत (Ncp)राष्ट्रवादीचे संतोष माने यांचा या मतदारसंघातून भाजपच्या प्रशांत बंब यांनी पराभव केला होता. सतीश चव्हाण यांच्या सारखा सक्षम उमेदवार दिला तर विजय मिळू शकतो या विचारातून वरिष्ठांनी देखील चव्हाणांना तयारीला लागा, असे आदेश दिल्याची चर्चा आहे. (Marathwada) मराठवाडा पदवीधरचे आमदार असून देखील सतीश चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यात गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघातील अनेक विषयांना हात घातला, त्यातील काही सोडवण्यात देखील त्यांना यश आले होते.

त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सतीश चव्हाण हे भाजप आमदार प्रशांत बंब यांना आव्हान देण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. प्रशांत बंब हे अपक्ष आणि दोनवेळा भाजपच्या तिकीटावर येथून निवडून आले आहेत. आता याच मतदारसंघातून नशिब आजमावण्याची चव्हाण यांची तयारी सुरू आहे. नेमकं गंगापूरमधूनच चव्हाण यांना का लढायचंय तर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे अन् पदवीधरचे सतीश चव्हाण या दोघांचीही कोंडी केली होती.

एवढेच नाही तर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची गरज नाही, ते रद्द केले पाहिजेत अशी खळबळजनक मागणी देखील बंब यांनी केली होती. त्यामुळे बंब यांनाच घरी बसवण्याची रणनिती राष्ट्रवादीने आखल्याचे बोलले जाते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघामुळे चव्हाण यांना प्रचार यंत्रणा राबवण्याचा दांडगा अनुभव असल्याने ते बंब यांना मात देवू शकतात, असा विश्वास पक्षश्रेष्ठींना आहे. गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघात काॅंग्रेस, शिवसेनेने प्रत्येकी तीनवेळा तर अपक्षांनी दोनवेळा विजय मिळवलेला आहे. तर भाजपला या मतदारसंघात दोनदा यश मिळाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने तरुण चेहरा म्हणून शिवसेनेतून पक्षात आलेल्या संतोष माने यांना उमेदवारी दिली होती. बंब यांच्यापुढे मानेंचा टिकाव लागणार नाही, असे वाटत असतांना ७२ हजार मते मिळवत त्यांनी भाजपला चांगली लढत दिली. पण बंब यांची रणनिती भेदण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले नव्हते. पण राष्ट्रवादी नव्याने जोर लावण्याच्या तयारीत असून भाजपकडून हा मतदारसंघ खेचण्याच्या प्रयत्नात आहे.

Ncp Mla Satish Chavan News, Aurangabad
Osmanabad News : भाजपने लोकसभा लढवल्यास पुन्हा राणापाटील-ओमराजे टक्कर ?

विधानसभा जिकांयची असले तर तळागाळात, वाडे, वस्त्या, तांड्यावर देखील संपर्क आवश्यक असतो. म्हणून वर्षभरापासून चव्हाण तयारी लागले आहेत. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्या सत्काराच्या निमित्ताने चव्हाण हे ग्रामीण भागात संपर्क वाढवत आहेत. गंगापूर-खुल्ताबाद तालुक्यातील ही तयारी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी असल्याचे चव्हाण सांगत असले तरी खऱ्या अर्थाने ती येणाऱ्या विधानसभेसाठीच असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in