Supriya Sule News : सुप्रियाताईंनी केलं पंकजाताईंचं कौतुक; म्हणाल्या, "निवडणुकीच्या वेळी टोकाची भूमिका घेऊ, मात्र...

Maharashtra Politics : ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी पंकजा मुंडे या नेहमी शरद पवारांकडे यायच्या."
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज (सोमवारी )भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे तोंडभरून कौतुक केलं. "निवडणुकीच्या वेळी आम्ही टोकाची भूमिका घेऊ. मात्र, ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल तेव्हा पंकजा मुंडेंचा मान सन्मान आम्ही नेहमीच केला आहे, त्या एक लढाऊ महिला आहेत," अशा शब्दांत सुप्रियाताईंनी पंकजाताईंचे कौतुक केलं.

"ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी पंकजा मुंडे या नेहमी शरद पवारांकडे यायच्या," अशी आठवण सुळेंनी सांगितली. "प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या मराठी मातीतील नेत्यांनी दिल्ली गाजवली. मुंडे-महाजन जोडीने महाराष्ट्र पिंजून काढत रान उठवलं होतं. त्यामुळे दिल्ली समोर आम्ही कधी झुकणार नाही," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule
Jayant Patil News : राष्ट्रवादी कुणाची? हे शेंबड्या पोराला विचारलं, तरी ते सांगेल...; आयोगाने यात बदल केला तर...

सामाजिक कार्यकर्ते, लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगरमध्ये अज्ञात तीन व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला आहे. हेरंब कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी हेरंब कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर आहे.

हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा सुप्रिया सुळेंनी निषेध केला. या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशी करावी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे सुळे म्हणाल्या. सुळे यांनी नगर येथे जाऊन हेरंब कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Supriya Sule
World Post Day 2023 : खासदार पुत्र बनला 'पोस्टमन' : कृष्णराजला पाहताच अनेक जण चक्रावले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com