राष्ट्रवादीचे नेते, विद्यार्थीप्रिय डाॅ. उल्हास उढाण यांचे निधन

डॉ. उढाण आयुष्यभर ज्या तत्वांनी जगले, त्यानुसार यापुढे अंत्यसंस्कार झाल्यानंतर कोणतेही धार्मिक विधी न करता अस्थी विसर्जन त्यांच्या शेतामध्ये करून त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.( Marathwada)
राष्ट्रवादीचे नेते, विद्यार्थीप्रिय डाॅ. उल्हास उढाण यांचे निधन
Dr. Ulhas UdhanSarkarnama

औरंगाबाद : शहरातील राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास उढाण (वय ५०) यांचे सोमवारी (ता. ६) पहाटे अडीचच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. (Marathwada) त्यांच्यावर सिडकोतील एन-सहा येथील स्मशानभूमीत दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. (Aurangabad) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आधार हरपला, अशी भावना विद्यार्थी, प्राध्यापकांनी व्यक्त केली.

डॉ. उल्हास उढाण हे २८ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. मराठवाड्यातील शैक्षणिक चळवळीत अग्रेसर असणारे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांसाठी चिवट लढा देणारे अशी त्यांची विद्यापीठात ओळख होती. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ अनेक आंदोलनातून दिसत होती.

याच भावनेतून त्यांनी ‘मास’म्हणजेच मराठवाडा असोसिएशन ऑफ स्टुडंट्सची बांधणी करत विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे त्यांनी उपाध्यक्षपदही भुषवले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य देखील होते.

काही महिन्यांपुर्वीच राज्यातील तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या धोरण निश्‍चिती सितीवर सदस्यपदी निवड झाली होती. यानिमित्त ते अनेक शहरात भेटी देत सीएसबीच्या प्राध्यापकांच्या अडचणी जाणून घेण्याचे काम करीत होते. डॉ. उढाण आयुष्यभर ज्या तत्वांनी जगले, त्यानुसार यापुढे अंत्यसंस्कार झाल्यानंतर कोणतेही धार्मिक विधी न करता अस्थी विसर्जन त्यांच्या शेतामध्ये करून त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अशी भूमिका त्यांचे मित्र डॉ. उमाकांत राठोड यांनी मांडली.

अंत्यसंस्काराला राजकीय लोकांसोबत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यांचा टाहो उपस्थितांचा हृदय पिळवटणारा होता. डॉ. उल्हास उढाण यांच्या निधनाबद्दल विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना आणि त्यांचा मित्रपरिवारातर्फे देवगिरी महाविद्यालयात शनिवारी (ता. ११) सायंकाळी सहा वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Dr. Ulhas Udhan
प्रिय उल्हास, आम्ही राजकारणी तुला काहीच देऊ शकलो नाही..

ध्येयनिष्ठ, कृतीशील व्यक्तिमत्त्व हरपलं-अजित पवार

"डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. उल्हास उढाण यांच्या निधनाने शैक्षणिक, साहित्य, सामाजिक क्षेत्रात तळमळीनं काम करणारं ध्येयनिष्ठ, कृतीशील व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. विद्यार्थी, युवक चळवळीचा मार्गदर्शक आपण गमावला आहे.

साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील," अशा, शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. डॉ. उल्हास उढाण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. उल्हास उढाण यांना श्रध्दांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, डॉ. उल्हास उढाण हे राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांचे पाईक होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी योगदान दिलं.

युवक, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या बरोबरीनं जाणीवजागृती निर्माण करण्याचं त्यांचं ध्येय होतं. त्यांचं आकस्मिक निधन ही राज्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in