धनंजय मुंडे आणि रोहित पवार वामनाभाऊंच्या चरणी

राज्य कोरोनामुक्त (Covid-19) व शेतकरी समृद्ध व्हावा, अशी प्रार्थना मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संत वामनभाऊ चरणी केली आहे.
Gahininath Gad
Gahininath GadSarkarnama

गहिनीनाथगड : दरवर्षी प्रमाणे यंदाही वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री. क्षेत्र गहिनीनाथगड (Gahininath Gad) येथील पारंपरिक महापूजेस उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते (NCP) व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केली. ते आज (ता. 25 जानेवारी) गहिनीनाथगड येथील पारंपरिक महापूजेस उपस्थित होते. राज्य कोरोनामुक्त (Covid-19) व्हावे, इथला शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आम्हाला काम करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही मुंडे यांनी यावेळी केली आहे.

Gahininath Gad
महाराष्ट्राला आहे अभिमान : 26 जानेवारीच्या पदकांत 51 पोलिस व अधिकारी

संत वामनभाऊ यांच्या 46 व्या पुण्यतिथी निमित्त पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथील वामनभाऊ यांच्या स्मृतिस्थळी मंत्री मुंडे व गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री (Vitthal Maharaj) यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने महापूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी प्रथमच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे या सोहळ्यास उपस्थित होते.

Gahininath Gad
नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाला भाजपचा विरोध..

यावेळी विठ्ठल महाराज यांना मंत्री मुंडे यांनी स्वतः फेटा बांधून आशीर्वाद घेतला. तर, गडावर प्रथमच आलेले रोहित पवारांना देखील त्यांनी स्वतः फेटा बांधून त्यांचे गडावर स्वागत केले. कोरोना निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे भाषण, कीर्तन व आशीर्वाद सोहळा न करता पारंपरिक पद्धतीने महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, सतिष शिंदे, शिवाजी महाराज नाकाडे, विश्वास नागरगोजे, गंहिनीनाथ सिरसाट, विठ्ठल अप्पा सानप, बन्सी खाडे, शिवदास शेकडे, अभिजित तांदळे यांसह अन्य गडाचे भक्तमंडळींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com