Ncp : मोदी लाटेत निवडून आलेल्या चिकटगांवकरांची आधी उमेदवारी कापली, आता गच्छंती ?

चिकटगांवकर यांनी आता पक्षातच राहू नये अशी परिस्थिती त्यांच्या समोर निर्माण करण्यात त्यांचे पक्षांतर्गत विरोधक यशस्वी झाले, असेच म्हणावे लागेल. (Ncp, Aurangabad)
Ncp Vaijapur News, Aurangabad
Ncp Vaijapur News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : वैजापूर तालुक्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट होती. या लाटेत विरोधकांची धुळधाण उडाली. तरी देखील वैजापूर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढत विजय मिळवला होता. भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी शिवसेना-भाजप, काॅंग्रेसच्या विरोधात ४७०० मतांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.

Ncp Vaijapur News, Aurangabad
Ncp : ठोंबरेंना राष्ट्रवादीत प्रवेश देत माझे राजकारण संपवण्याचा सतीश चव्हाणांचा कट..

राष्ट्रवादीतील राज्य आणि देश पातळीवरील नेत्यांनी देखील या विजयाचे तोंडभरून कौतुक केले. पण मोदी लाटेत निवडून आलेल्या त्यात भाऊसाहेब चिकटगांवकरांची उमेदवारी २०१९ च्या निवडणुकीत हिसकावून घेण्यात आली. (Ncp) पक्षांतर्ग विरोधकांनी चिकटगांवकर यांच्या पुतण्यालाच त्यांच्याय विरोधात मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली. (Aurangabad) राजकारणामुळे कुटुंबात कलह नको, अशी भूमिका घेत भाऊसाहेब पाटलांनी देखील मला नको, पुतण्या अभयला उमेदवारी द्या, असे म्हणत माघार घेतली. पण त्यावेळी केलेला त्यागच आता त्यांच्या अंगलट आला आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी तर गेलीच पण मोदी लाटेत पहिल्यांदा जिंकलेली जागा हातातून निसटली. त्यामुळे पश्चातापाशिवाय चिकटगांवकर यांच्या हाती काहीच राहिले नाही. आमदार नसतांनाही त्यांनी मतदारसंघातील संपर्क कायम ठेवला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी यातही खंड पडू दिला नाही. पण अंतर्गत विरोधक आपले काम करतच होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष सत्तेवर होते. राष्ट्रवादी पक्षाकडे सगळी महत्वाची खाती होती. त्यामुळे चिकटगांवकर मतदारसंघातील छोटी-मोठी काम घेऊन मंत्रालयात नेत्यांना भेटत होते.

चार महिन्यांपुर्वी राज्यात पुन्हा सत्तांतर झाले आणि चिकटगांवकरांचे वासेच फिरले. पक्ष, संघटना मजबुत करण्याच्या नावाखाली इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षात घेत असतांनाच काही ठिकाणी जुन्या नेत्यांना बाजुला करण्याचे प्रयत्न देखील झाले. परभणी जिल्ह्यात बाबाजाणी दुर्राणी यांच्याबाबतीत असेच घडल्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता. वैजापूरमध्ये भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्याबाबतीत देखील तेच होतांना दिसते आहे.

काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे, त्यांचे जिल्हा परिषद सदस्य असलेले पुतणे पंकज ठोंबरे यांना राष्ट्रवादीत प्रेवश मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून चिकटगांवकर विरोधक प्रयत्न करत होते. परंतु ठोंबरेंना पक्षात प्रवेश दिला तर ताुक्यात राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडतील याची जाणीव चिकटगांवकर यांनी पक्षश्रेष्ठींना प्रत्यक्ष भेटीत आणि लेखी पत्राद्वारे करून दिली होती. त्यामुळे ठोंबरेंचा पक्ष प्रवेश दोनदा टळला होता.

Ncp Vaijapur News, Aurangabad
Shivsena : सुषमा अंधारे करणार भुमरे, सत्तारांचे `प्रबोधन`, १८ - १९ ला मतदारसंघात घेणार सभा..

परंतु अखेर काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार यांच्या उपस्थतीत ठोंबरे आणि कंपनीचा प्रवेश राष्ट्रवादीत झालाच.त्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे आज उमटले. कालच्या प्रवेश सोहळ्याच्या वेळी चिकटगांवकर आणि त्यांचे समर्थक गैरहजर होते. तर पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांची मात्र उपस्थिती होती.

सतीश चव्हाण यांनीच आपले राजकारण संपवण्यासाठी हा कट रचला आहे, असा जाहीर आरोप देखील चिकटगांवकर यांनी केला आहे. त्यामुळे चिकटगांवकर यांनी आता पक्षातच राहू नये अशी परिस्थिती त्यांच्या समोर निर्माण करण्यात त्यांचे पक्षांतर्गत विरोधक यशस्वी झाले, असेच म्हणावे लागेल. आता चिकटगांवकर कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतात, यावर वैजापूर तालुक्यातील राजकीय घडामोडी अंवलबून राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in