NCP News : विमानातून उतरताच अजित पवार जखमी कार्यकर्त्याच्या भेटीला रुग्णालयात..

Ajit Pawar : राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर ३१ डिसेंबर रोजी हल्ला झाला होता.
Ajit Pawar In Hospital News, Aurangabad
Ajit Pawar In Hospital News, AurangabadSarkarnama

Aurangabad : राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे वेळेचे पक्के आहेत. अगदी पहाटे, सकाळी ते ठरलेल्या ठिकाणी पोहचतातच. अनेकदा त्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची तारांबळ देखील होते. (Ncp) कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे अजित पवार फटकाळ तितकेच काळजी करणारे देखील असल्याचे आज दिसून आले.

Ajit Pawar In Hospital News, Aurangabad
Ramdas Kadam News : 'माझ्या मुलाचा अपघात घडवण्याचा कट होता'; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

औरंगाबाद (Aurangabad) येथे मराठवाडा शिक्षक मतदारंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) आज सकाळी आठ वाजताच औरंगाबादेत दाखल झाले. चिकलठाणा विमातळावर उतरताच त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा शहरातील सिग्मा हाॅस्पीटलकडे वळवला. त्यांच्या या भेटीची माहिती अगदी थोड्याच लोकांना होती, त्यामुळे अनेकांना अजित पवार कुठे जातायेत हे माहित नव्हते.

पण सिग्मामध्ये उपाचर घेत असलेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ते आल्याचे लक्षात आले. त्यांच्यासोबत पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण देखील होते. पैठण तालुक्यातील बोकूड जळगांव येथील ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच्या वादातून राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर ३१ डिसेंबर रोजी हल्ला झाला होता.

त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर सिग्मा हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच औरंगाबादेत दाखल होताच अजित पवारांनी रुग्णालयात धाव घेत तरमळे यांची भेट घेत आस्थेवाईकपणे चौकशी केली. डाॅक्टरांशी देखील चर्चा केली. त्यानंतर तरमळे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांना देखील दिलासा दिला. तसेच काळजी करू नका, काही मदत लागली तर कळवा, असे सांगत त्यांनी रुग्णालय सोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in